

गत महिन्यात १८ मे रोजी तुंगत भोसले वस्ती येथील रहिवाशी योगेश दादासाहेब जाधव (वय वर्षे ३४ ) हे मोटारसायकल वरून पंढरपूर कडून तुंगतकडे जात असताना देगाव हद्दीतील घाडगे वस्ती येथे पाठीमागून बजाज पल्सर दुचाकी वरून आलेल्या तिघाजणांनी मोटार सायकल आडवी लावून योगेश जाधव यांच्या दुचाकीची चावी काढून घेत मारहाण करून त्यांच्या जवळील ५० हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेत हे तिघेही इसम निघून गेले होते.या प्रकरणी योगेश जाधव यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत सपोनि खरात,सपोनि ओलेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते.या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक कौशल्याचा वापर करीत गुप्त माहिती काढत गुन्हा उघडकीस आणला आहे.या प्रकरणातील आरोपी लखन रायप्पा काळूंखे,आशु दत्ता जाधव,गणेश बिरू जाधव (रा.पंढरपुर) यांना अटक करण्यात आली आहे.