गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

गोपाळपूर नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची कारवाई 

           पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या परिसरातुन होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसून येत असून रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोपाळपूर नजीक केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एक पिकअप वाहन १ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

दारूडया दुचाकीचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांची जोरदार मोहीम

             शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वेगाने दुचाकी चालवत जाणारे तर्राट पाहिले कि या शहरातील काही प्रमुख रस्त्यावरून पायी येजा करणारे नागिरक व सामान्य वाहनचालक यांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही.सुसाट वेगाने अथवा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या पद्धतीने वाहन अथवा दुचाकी चालिवणाऱ्या मध्ये दारूड्यांचे प्रमाण मोठे असून अशा दुचाकी चालकांवर कारवाई […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड

श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड   पंढरपूर, दि. २१ : पंढरपूर तालुक्‍यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ भारत भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक २१.१२.२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील सभागृहामध्ये अध्यासी प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक श्री एस.एम.तांदळे यांचे अध्यक्षतेखाली संचालकांची समा आयोजित करणेत […]

ताज्याघडामोडी

सिताराम च्या गळीत हंगामाचा शुभारंभ

सिताराम च्या गळीत हंगामाचा शुभारंभ पंढरपूर (प्रतिनिधि) दि२१- खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या 8 व्या बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा. शिवाजी काळुंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शोभाताई काळुंगे, चेअरमन धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेट बँक, मंगळवेढा यांचे हस्ते गव्हाण पुजन तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी […]

ताज्याघडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा  निधी मंजूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा  निधी मंजूर   पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून ‘मायक्रो फ्लुइडिक्स’ या विषयावरील स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा  संशोधन निधी मंजूर झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.           […]

ताज्याघडामोडी

कासाळ ओढ्याला मिळणार कॅनाॅलचा दर्जा

कासाळ ओढ्याला मिळणार कॅनाॅलचा दर्जा पंढरपूर तालुक्यातील ७ ते ८ गावे होणार कायमची दुष्काळमुक्त, जलसंपदामंञ्यांनी दिला लेखी आदेश पंढरपूर – सांगोला तालुक्यातून उगम पावणारा व पंढरपुर तालुक्यातील गार्डी, पळशी, सुपली, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, वाडीकुरोली या गावातून वाहत जाणारा कासाळ ओढा भीमा नदीला मिसळतो. या ओढयामध्ये वरील सर्व गावांच्या पाणीपुरवठा विहीरी आहेत. त्यामुळे ओढयाला कॅॅॅॅनाॅलचा दर्जा […]

ताज्याघडामोडी

सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप…

सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप… पंढरपूर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. व सौ. सविता रवि सोनार यांची सुवर्णकन्या कु. रेवती सोनार हिच्या जन्मदिवसाच्या औचित्याने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला सोनार कुटुंबियांनी फाटा दिला आहे. परंतु वाचलेल्या रकमेतून त्यांची आस्थापना असलेल्या दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे व्यवस्थापक व सहकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना लोकरीचे उबदार स्वेटर स्नेहभेट […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरीत असे पहिल्यांदाच घडले, बदली झाली म्हणून पेढे वाटले !

        पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बहुप्रतीक्षित बदली झाल्याचे वृत्त आज पंढरपूर शहर व तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकले आणि वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारून वैतागून गेलेल्या अनेक सर्वसामान्य नागिरकांनी आनंद व्यक्त केला असून त्याच बरोबर बळीराजा शेतकरी संघटना,कोळी महासंघ यांनी तर संत नामदेव पायरी परिसरात अक्षरश पेढे वाटून आपला आनंद साजरा […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार- महावीर देशमुख

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार- महावीर देशमुख पंढरपूर (प्रतिनिधी):- ग्रामपंचायत निवडणुकीचे ‘पडघम’ वाजण्यास सुरुवात झाली असुन पंढरपूर तालुक्यातील ज्या-ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली. ग्रामीण भागातील तळागालातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणुक लढवणार असल्याचेही ते म्हणाले. […]

ताज्याघडामोडी

स्वेरीत कोरोनामुक्ती अभियान संपन्न

     पंढरपूर- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय ‘कोरोनामुक्ती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली.          या कोरोनामुक्त अभियानाचे […]