गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

दारूडया दुचाकीचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांची जोरदार मोहीम

             शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट वेगाने दुचाकी चालवत जाणारे तर्राट पाहिले कि या शहरातील काही प्रमुख रस्त्यावरून पायी येजा करणारे नागिरक व सामान्य वाहनचालक यांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही.सुसाट वेगाने अथवा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या पद्धतीने वाहन अथवा दुचाकी चालिवणाऱ्या मध्ये दारूड्यांचे प्रमाण मोठे असून अशा दुचाकी चालकांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा सामान्य नागिरकांकडून व्यक्त होत होती.आणि आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जणू काही मोहीमच हाती असल्याचे दिसून आले असून  काल रविवारी दारू पिऊन दुचाकी चालविण्याऱ्या १० दुचाकी चालकांची ब्रेथ आनलाइजर तपासणी करून त्याच्या विरूध्द मोटार वाहन कायदा कलम 185प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. 
          पंढरपूर शहर पोलिसांनी रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत ज्या १० दुचाकी चालकांवर कारवाई केली आहे त्यामध्ये शहर व तालुक्यातील व्यक्तींचा समावेश आहे.या कारवाईमुळे दारू पिऊन वाहन चालविण्याऱ्यांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.याच बरोबर पंढरपूर शहरातील प्रमुख व जास्त वर्दळीचा रस्ता असलेल्या स्टेशन रोड सावरकर पथ या रस्त्यावर सायंकाळच्या अतिशय सुसाट वेगाने कधी ट्रिपल सीट दुचाकी चालवीत ”थरार” अनुभवणाऱ्या बेभान दुचाकी चालकांवर कारवाई केली जावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *