मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे. या पोस्टरवरून जोरदार चर्चा सुरू आहे. आता या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवली आहे. मुंबई पोलिसांनी […]
ताज्याघडामोडी
पत्नीची निधनवार्ता ऐकून पती नि:शब्द; १० तासांनंतर जीव सोडला
पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दहा तासांनी पतीनेही प्राण सोडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावात घडली आहे. एकाचवेळी दोघा पती पत्नीची अंत्ययात्रा निघाल्याने गावकऱ्यांचेही डोळे पाणावले होते. जियेंगे भी साथ साथ और मरेंगे भी साथ साथ या हिंदी चित्रपट गीताचा या घटनेतून प्रत्यय आला आहे. सिंधुबाई दत्तात्रय वाणी (वय ७५) व दत्तात्रय गणपत […]
नादुरुस्त बॉयलर बेल्ट अचानक सुरु, कामगार आत ओढला गेला, पट्ट्यात अडकून जीव गमावला
बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखान्यात घडली. काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेची माहिती मिळताच कारखान्यातील इतर कर्मचारी आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेविषयी अधिक माहिती अशी, की कल्याण गणपती टोले (वय वर्ष ४०) हा आनंदगाव येथील […]
ठाकरे समर्थनाची ती शेवटची पोस्ट टाकून तो कायमचे जग सोडून गेला, कट्टर समर्थकाच्या अकाली एक्झिटने हळहळ
‘ठाकरेच आमचा पक्ष आणि ठाकरेच आमचे चिन्ह…’, अशी पोस्ट करून कट्टर ठाकरे समर्थक रात्री झोपला. ती त्याची शेवटचीच पोस्ट ठरली. त्याच्या पोस्टला लाईक मिळत असतानाच भल्या सकाळी तो हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने गेल्याची बातमी कळली आणि सारेच हळहळले. प्रवीण दत्तात्रेय अनभुले (वय ३२) या अहमदनगरमधील तरुणाच्या निधनाने त्याचे प्रत्यक्षातील आणि सोशल मीडियातील मित्र हळहळ व्यक्त […]
२३ वर्षीय तरुणाला हाव सुटली, हातावर पोट असलेल्या महिलेचा खून, सात दिवसात गूढ उकललं
मासे विक्री करणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा खून झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डिंगणी परिसरात हा प्रकार घडला होता. अखेर हत्या प्रकरणी २३ वर्षीय युवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपी जयेश रमेश गमरे यानेच पैशांसाठी खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. अत्यंत दुर्गम व जंगलमय भागात हा […]
पडते शेअर्स, घसरती संपत्ती… तरीही अदानींच्या शेअरवर ब्रोकरेजला भरवसा, दिला खरेदीचा सल्ला
अब्जाधीश गौतम अदानी यांचा एकावेळी भारतीय व्यवसाय क्षेत्रासह शेअर बाजारात देखील दबदबा होता. बाजारात सूचिबद्ध अदानी समूहातील १० कंपन्यांपैकी जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअर्सची किंमत गगनाला भिडल्या होत्या आणि गुंतवणूकदारांची चंगळ होती. पण नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याअखेरीस एक अहवाल आला ज्याने अदानी साम्राज्याला हादरवून सोडले. २४ जानेवारी रोजी अमेरिकेची शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रकाशित झाला […]
उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा झटका, निवडणूक आयोगाच्या निकालातील ‘या’ मुद्द्यावर स्थगिती देण्यास नकार
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतय. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलाय. सुप्रीम कोर्टातील 16 अपात्र आमदारांच्या याचिकेची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्या. तसेच निवडणूक आयोगाने बँक अकाउंट आणि मालमत्तेबाबत दिलेल्या निर्णयावर स्थगिती द्या, अशी प्रमुख […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा
पंढरीत ठाकरे समर्थकांची शहर पोलीस ठाण्यात धाव राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात अपशब्द वापरले व शिवराळ भाषेचा प्रयोग केला असून त्यामुळे अमित शहा यांच्यावर भादंवि १५३(अ),४९९,५००,५०६ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्याकडे निवेदन देत ठाकरे समर्थकांनी केली […]
लग्नाच्या रिसेप्शनसाठी तयार व्हायला गेलेले नवरी-नवरदेव; काही वेळाने मृतावस्थेत आढळले, कारण हादरवणारं
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. मात्र लग्नानंतर तीन दिवसातच एका व्यक्तीने जे काही केलं ते जाणून तुम्हीही हादराल.घटना छत्तीसगडच्या रायपूरमधून समोर आली आहे. यात एकाच खोलीत नवरदेव आणि नवरीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. यात रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी खोलीत गेलेल्या नवरदेवाने आधी आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर […]
‘मशाल’ चिन्हासाठी समता पार्टीचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “बिहारहून आमचे सदस्य…”
निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्ह गमावलं आहे.त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर राजकीय समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. दरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू असताना निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे तात्पुरतं निवडणूक चिन्ह देऊ केलं होतं. याच […]