झारखंडच्या धनबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या मुलानं आत्महत्या केली आहे. त्यानं सल्फरच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवलं. मुलाच्या अकाली निधनानं आमदाराच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पक्षानंदेखील याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाजप आमदाराला करोनाची लागण झाली होती. करोनातून बरे झाल्यानंतर त्यांना काही त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते हैदराबादमध्ये उपचार घेत आहेत. धनबादमधील सिंदरी विधानसभा मतदारसंघाचे […]
ताज्याघडामोडी
पैज लागली! १० मिनिटांत ३ क्वॉर्टर दारू संपवली; आयुष्याची बाजी लावून तरुण जिंकला, पण…
दारुचं व्यसन हे अत्यंत घातक असतं हे सर्वांनाच माहिती आहे. तरीही अनेकांना दारुचं व्यसन जडलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरावरही मोठा परिणाम होतो. अनेकदा दारुमुळे अनोकांना आपला जीव गमवावा लागतो. याची अनेक उदाहरण आपण पाहिली असेल. उत्तर प्रदेशातील आग्रा येथेही असंच काहीसं झालं आहे. जिथे, दारुमुळे एका व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये […]
सात महिन्यांची गर्भवती, पोटात जुळी मुलं, रिक्षाची वाट पाहताना चक्कर येऊन कोसळली अन् घात झाला
नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सात महिन्यांची गरोदर माता डॉक्टरांकडे जात असताना रस्त्यात रिक्षाची वाट बघत होती. यावेळी या गरोदर मातेला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. तिच्यासोबत पोटात असलेल्या दोन जुळी अर्भकही मृत पावली आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. […]
शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गोव्यातील सप्तकोटेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार, उदयनराजेंनी मानले आभार
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पणजीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा गोवा सरकारकडून नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर उदयनराजे भोसले यांनी ट्विट करुन गोवा सरकारचे आभार मानले आहेत. पोर्तुगिज तसेच बहामनी राजवटीत भारताचा दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर १६८८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या […]
पायाला शेण लागलं, कालव्यात धुताना ३० वर्षांचा तरुण बुडाला
अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेणाची घाण धुण्यासाठी गेला असताना पाय घसरल्यामुळे तो कालव्यात पडला. मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जहीर बेग रफीक बेग असे ३० वर्षीय युवकाचे नाव आहे. कुऱ्हा येथील बस स्थानक परिसरात त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. जहीर बेग आणि त्याचे दोन सहकारी […]
नव्या घराचं काम सुरु, पाणी मारत असताना विजेचा धक्का, डॉक्टरांची एक चूक नडली अन् होत्याचं नव्हतं झालं..!
आई, आजी, एक लहान तर एक मोठा भाऊ यांची जबाबदारी पेलणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचं पोलीस किंवा सैन्यात जायचं अन् छोटसं घरकुल बांधायचं स्वप्न अधुरं राहिलं. आता कुटुंबाची जबाबदारी अर्ध्यावर सोडून त्याने जगाचा निरोप घेतलाय. वैद्यकीय क्षेत्रातील ढिसाळपणाचा तो बळी ठरलाय, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी अन् मित्रांनी केलाय. ही घटना औसा तालुक्यातील तांबरवाडी येथील असून […]
दुरुस्तीचे काम सुरू असताना घराचा स्लॅब कोसळला; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात आज सकाळी मोठी घटना घडली. घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या तरुणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. मुंबई अग्निशमन दलाला सकाळी ९.४२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. ही माहिती मिळाताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित वॉर्डमधील अधिकाऱ्यांनी घटना […]
लेकीला नवऱ्याकडून त्रास, आई पोलिसांत; जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला
कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हा वाद मिटल्याचे भासवत जावयाने सासूवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा थरार पोलीस स्टेशनमध्येच रंगला. मात्र, दक्ष पोलीस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पण पोलीस स्टेशनमध्येच सासूवर जावयाने केलेल्या हल्ल्याची शहरभर चर्चा सुरु आहे. या हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, […]
महिला पोलिसाला शस्त्रक्रिया करून व्हायचंय पुरुष, याचिका करत हायकोर्टात धाव
लिंग बदलासाठी मुंबई हायकोर्टात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला कुठलाही दिलासा मिळाला नाही. आधी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कडे दाद मागावी, अशी सूचना हायकोर्टाने महिला पोलिसाला केली आहे. नांदेडची महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा उर्फ विजय पवार (वय ३६ ) यांनी मुंबई हायकोर्टात लिंग बदलासाठी याचिका केली आहे. आपल्याला शस्त्रक्रिया करून पुरुष व्हायचं आहे. यासाठी एक महिन्याची रजा […]
देशभरातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलले, पाहा संपूर्ण यादी; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. याशिवाय राष्ट्रपतींनी १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली आहे. झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांच्याकडे आसामची, माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी […]