गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर 20 दिवसातच नवरीने केला धक्कादायक खुलासा; ऐकताच हादरला पती, गाठलं पोलीस ठाणं

तेल, गॅस आणि कोळसा उत्खननामुळे झपाट्याने बदलणाऱ्या बारमेर जिल्ह्यात फसव्या नवऱ्या आणि त्यांच्या दलालांनी आपलं जाळं भक्कम केलं आहे. अशाच एका घटनेत बारमेर जिल्ह्यात पुन्हा एकदा नवरीने तिच्या टोळीतील सदस्यांसह एका कुटुंबाला लक्ष्य केलं. गुजरातमधील रहिवासी असलेली ही नवरी 20 दिवस आपल्या पतीसोबत राहून लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळून गेली. फरार नवरी आधीच विवाहित असून […]

ताज्याघडामोडी

मुंबईत मराठा समाजाचा एल्गार, आरक्षणासाठी संभाजीराजेंचं उपोषण

मराठा समाजाच्या आरक्षणाचं घोंगडं अद्याप भिजतंय. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं मागासवर्गातून मिळणारं आरक्षण रद्द केल्यानंतर नाराजीचे सूर आहेत. यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी यंदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.ते आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. याआधीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं होतं. छत्रपतींनी उपोषणाची घोषणा करताच राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. […]

ताज्याघडामोडी

राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटविणार; आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय

राज्यातील बहुतेक कोरोना निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे. मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने सादरीकरण केले. राज्यातील निर्बंध हटविताना संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नक्कल करण्यासाठी विद्यार्थ्याने लढवली हायटेक शक्कल! शिक्षकही झाले थक्क

परीक्षेत नक्कल अर्थात कॉपी करणं हा काही नवीन प्रकार नाही. पण, काळाच्या ओघात कॉपी करण्याच्या पद्धती मात्र आधुनिक होत चालल्या आहेत. मध्य प्रदेशात अशाच एका शक्कलेमुळे शिक्षकही थक्क झाले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षेवेळी हा प्रकार घडला आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा भलताच वापर करून या विद्यार्थ्याने अशी काही युक्ती लढवली की […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार, दोघे जखमी

जमिनीच्या वादातून बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात दोघे जण जख्मी झाले. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळाचा ताबा पोलिसांच्या पथकाने घेतला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या मुद्रांक नोंदणी कार्यालयामध्ये शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जमिनीच्या […]

ताज्याघडामोडी

“मला त्याच्याकडे जायचंय…” मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

मित्राच्या निधनाचा धक्का बसल्याने तरुणाने आयुष्य संपवलं. औरंगाबाद जिल्ह्यात ही हृदयाला चटका लावणारी घटना उघडकीस आली आहे. चेतन दिलीप बनस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 28 वर्षांचा होता. जेमतेम आठ दिवसांपूर्वी चेतनच्या मित्राने जगाचा निरोप घेतला होता. आजारपणामुळे मित्राचा मृत्यू झाला होता. मात्र जीवलगाचा विरह सहन न झाल्यामुळे चेतनने आत्महत्या केल्याचा धक्कादायक […]

ताज्याघडामोडी

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची धाड

नवाब मलिक यांच्या नंतर दोन दिवसात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे  नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे पथक दाखल झालं आहे. कारवाईचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरआहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे. इनोव्हा गाड्यांमधून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लेक युक्रेनमध्ये अडकली; भामट्याने फ्लाईट तिकीट देतो सांगून आईला घातला 44 हजारांचा गंडा

रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि […]

ताज्याघडामोडी

कै.मा.आ.गणपतराव देशमुख व शेकापचे नाव घेत काहीजण सामान्य लोकांना धमकावत आहेत

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले शेकापचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत सांगोला तालुक्यातील जनतेला महत्वपूर्ण आवाहन केल्याने सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.               डॉ.अनिकेत देशमुख यांच्या फेसबुक पेजवरून आज गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी एक […]

ताज्याघडामोडी

बारावी परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये बदल; ‘हे’ 2 पेपर्स ढकलले पुढे

कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थी विरोध करत आहेत. तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार दहावी […]