

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले शेकापचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत सांगोला तालुक्यातील जनतेला महत्वपूर्ण आवाहन केल्याने सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
डॉ.अनिकेत देशमुख यांच्या फेसबुक पेजवरून आज गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी एक पोस्ट करण्यात आली असून या नुसार सांगोला तालुक्याचे दैवत स्वर्गीय माजी आमदार देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे नाव वापरून सामान्य नागिरकांना धमकावणे व त्यांना मानिसक त्रास देणे असे प्रकार करत आहेत.या बाबतच्या तक्रारी डॉ.अनिकेत देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
जर अशा प्रकारे कोणी पक्षातील अथवा पक्षाबाहेरील लोक त्रास देत असतील तर सर्वसामान्य जनतेने तात्काळ संर्पक करावा,भेट नाही झाली तर फोन करावा असे आवाहन डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले असून स्व.आबासाहेब किंवा पक्षाच्या प्रतिमेला कोणी धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे.