गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर 20 दिवसातच नवरीने केला धक्कादायक खुलासा; ऐकताच हादरला पती, गाठलं पोलीस ठाणं

तेल, गॅस आणि कोळसा उत्खननामुळे झपाट्याने बदलणाऱ्या बारमेर जिल्ह्यात फसव्या नवऱ्या आणि त्यांच्या दलालांनी आपलं जाळं भक्कम केलं आहे.

अशाच एका घटनेत बारमेर जिल्ह्यात पुन्हा एकदा नवरीने तिच्या टोळीतील सदस्यांसह एका कुटुंबाला लक्ष्य केलं. गुजरातमधील रहिवासी असलेली ही नवरी 20 दिवस आपल्या पतीसोबत राहून लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळून गेली. फरार नवरी आधीच विवाहित असून तिला एक मुलगीही आहे.

कोतवाली पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. मात्र अद्याप ही वधू आणि दलालांचा कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमडा येथील रहिवासी मेहराम जाट याचा विवाह गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणाऱ्या ममतासोबत गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी झाला होता.

बारमेर जिल्ह्यातील कोसारिया येथील रहिवासी असलेला दलाल जोगाराम याने लग्नासाठी मेहरामकडून तीन लाख रुपये घेतले होते. हे लग्न झालं पण ममता केवळ 20 दिवसच मेहराम याची पत्नी बनून राहिली. लग्नाच्या 20 दिवसानंतर मेहराम कामासाठी बाहेर गेलेला होता. कामावरून घरी परतल्यावर पत्नी ममता घरी नसल्याचं त्याला समजलं.

जेव्हा तो ममताशी बोलला तेव्हा ती म्हणाली, ‘माझं आधीच लग्न झाले आहे आणि मला एक मूलही आहे’. हे ऐकून मेहरामच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पीडित मेहरामने पोलीस अधीक्षकांकडे जाऊन आपली व्यथा सांगितली. तातडीने कारवाई करत पोलीस अधीक्षकांनी कोतवाली पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. मेहराम यांनी फसवणूक करणारी नववधू ममता, दलाल जोगाराम आणि अहमदाबाद येथील इतर 2 लोकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही नववधू 5 लाख रुपये, 50 तोळे चांदीचे दागिने आणि 2 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याचं पीडित मेहराम यांनी सांगितलं. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

त्याचवेळी या प्रकरणाचा तपास करत असलेले हेड कॉन्स्टेबल इंदर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, पीडित मेहरामच्या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दलाल जोगाराम याने बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करून लग्न करून दिलं होतं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *