उत्तर प्रदेशातल्या कौशांबी जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. तिला झालेल्या मुलाची तस्करी करण्याचा प्रयत्न झाल्याचंही उघडकीस आलं आहे. ती गर्भवती झाल्यावर तिच्या पोटात ट्यूमर झालेला असू शकेल, असं तिच्या कुटुंबीयांना खोटंच सांगून एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिची डिलिव्हरी करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराची माहिती कळताच सीडब्ल्यूसीने (बालकल्याण समिती) पीडिता […]
ताज्याघडामोडी
मुलांनीच केला जन्मदात्यांचा घात, जादूटोण्याच्या संशयातून केली आई-वडील आणि भाचीची हत्या
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी गावात ६ डिसेंबर रोजी झालेल्या वृद्ध दाम्पत्य आणि एका दहा वर्षीय बालिकेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे. दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध आई-वडील आणि भाचीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून […]
13 वर्षांची चिमुरडी घरातलं सगळं काम करायची, पण मालकाने सगळ्या सीमा ओलांडल्या
कामगार, मजूरांवर मालकांनी अत्याचार केल्याच्या घटना अनेकदा घडतात. हरियाणात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकाने निर्दयपणे मारहाण केली. तसंच तिला कपडे उतरवण्यास आणि कुत्र्याला तिला चावण्यास भाग पाडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, तपास सुरू आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हरियाणातल्या गुरुग्राममधून […]
नवरी नटून बसली; लग्नाची वेळ होताच वधू पक्षाचे धक्कादायक कृत्य, वराडी मंडळीवर टाकली मिरची पावडर अन्…
अविवाहित मुलांची संख्या वाढत असून अशा अविवाहित मुलांसाठी पालक मुली शोधत असतात. दलालामार्फत किंवा नातलगांच्या माध्यमातून मुली शोधत असतात. केवळ विश्वास ठेवल्यामुळे अनेक कुठे ना कुठे पालकांची फसवणूक झाल्याचे प्रकार रोजच आपण ऐकत असतो. असाच प्रकार धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ताकमोडवाडी येथे घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ३ महिन्यांपूर्वी नवरदेवाचा काका आणि नवरीची आई […]
जमिनीच्या वादातून चुलत्याला संपवलं, कुऱ्हाडीने वार करत अर्धा तास रक्तरंजित थरार, दुचाकीवर शीर घेऊन फरार
सोलापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना सोमवारी घडली आहे. शेतीच्या वादावरून पुतण्याने चुलत्याचा कुऱ्हाडीने गळा कापला. तो एवढ्यावर न थांबता कुऱ्हाडीने मुंडके धडावेगळे केले. सावत्र चुलत्याची निर्घृण हत्या करून संशयीत आरोपी पुतणे हे मुंडके घेऊन फरार झाले होते. खुनाचा थरार माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शेवरे येथील कुरणवस्तीवर सोमवार दि. ११ रोजी सकाळी साडेदहाच्या […]
आधी दीड कोटीचं कर्ज काढलं, मग उधार देणाऱ्याचीच दिली सुपारी; विचित्र प्रकरणामुळे पोलिसही थक्क
किरकोळ कारणांवरून आत्महत्या करणं किंवा आप्तेष्टांना जीवे मारण्याच्या घटना सध्या आजूबाजूला घडत असल्याचं आपल्याला वाचायला, ऐकायला मिळतं. अगदी क्षुल्लक कारणांवरून हे गुन्हे घडतात. अनेकदा गुन्ह्यांसाठी वैर, बदल्याची भावना, विश्वासघात किंवा फसवणूक कारणीभूत ठरते. असाच एक विश्वासघाताची घटना घडली आहे. दीड कोटी रुपये उधार घेतल्यानंतर ते परत द्यायला लागू नयेत म्हणून कर्ज देणाऱ्या उद्योजकाचीच हत्या घडवून […]
सोशल मीडियावर स्वत:ला श्रद्धांजली वाहून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरी अढळला मृतदेह
केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ वर्षीय इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने मोबाईल स्टेटसवर स्वत:च्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, अजमल शरीफ असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो केरळ येथील अलुवा येथे वास्तव्यास […]
धावत्या ट्रेनमधील AC कोचमध्ये महिलेवर अत्याचार, मग आरोपीनं बोगीबाहेर फेकून गेट बंद केलं अन्…
कटनी ते सतना दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये महिलेसोबत छेडछेड केल्याची घटना समोर आली आहे. सतना रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबल्यावर आरोपीने महिलेला बोगीतून बाहेर फेकून गेट बंद केलं. ट्रेन स्टेशनवर 30 मिनिटं उभी होती, पण जीआरपीला बोगीचं गेट उघडता आलं नाही. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडल्याचं सांगण्यात येत आहे. सतनाहून निघाल्यानंतर रीवाच्या आधी बगहाई येथे गाडी […]
मुख्याध्यापिका पत्नीचं निर्दयी कृत्य, पतीला जाळून मारण्यासाठी मुलीच्या मित्रांची घेतली मदत
कल्याणपूर्वेतील विजयनगर परिसरात एका घराला आग लागली. पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी आग विझवण्यासाठी दाखल झाले. घराची आग विझवण्यात आली. मात्र आग विझवल्यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीने आपल्या मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने आपल्या पतीला ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे घरात आग लागली. यात पती हरिश्चंद्र पवार गंभीर जखमा झाले होते त्यांचा […]
सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी, धक्कादायक कारण समोर
पैशाचा वाद टोकाला गेल्याने सख्ख्या भावाने आपल्या सैनिक असलेल्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण विनायक पवार असे मयताचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड […]