ताज्याघडामोडी

नवरी नटून बसली; लग्नाची वेळ होताच वधू पक्षाचे धक्कादायक कृत्य, वराडी मंडळीवर टाकली मिरची पावडर अन्…

अविवाहित मुलांची संख्या वाढत असून अशा अविवाहित मुलांसाठी पालक मुली शोधत असतात. दलालामार्फत किंवा नातलगांच्या माध्यमातून मुली शोधत असतात. केवळ विश्वास ठेवल्यामुळे अनेक कुठे ना कुठे पालकांची फसवणूक झाल्याचे प्रकार रोजच आपण ऐकत असतो. असाच प्रकार धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ताकमोडवाडी येथे घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ३ महिन्यांपूर्वी नवरदेवाचा काका आणि नवरीची आई यांची ओळख छत्रपती संभाजीनगर येथील बसमध्ये झाली. चर्चेमध्ये पुतण्या लग्नाचा असल्याचे सांगताच नवरीच्या आईने त्यांची मुलगी लग्नाची असल्याचे सांगितले. नंतर दोघांनी वारंवार फोनवर संपर्क केला. मुलगी सुंदर असल्यामुळे लग्नाचे निश्चित झाले. १ लाख रुपये रोख आणि ३ तोळे सोने नवरी मुलीला देण्याचे ठरले. यातील फिर्यादी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अंतुलीर बुद्रक येथील विजय प्रताप पाटील यांचे पुतणे यांच्याशी दिपाली भोसले या मुलीचे लग्न लावून देतो, असे आमिष मुलीची आईने विजय पाटील यांना दाखवले होते.

लग्नासाठी मुलाकडून मुलीला १ लाख रूपये रोख आणि ३ तोळे सोन्याचे दागिने देण्याचे ठरले होते. लग्न परंडा तालुक्यातील ताकमोडवाडी येथे मुलीच्या घरी दि. ७ डिसेंबर रोजी करून देण्याचे ठरले होते. ठरलेल्या वेळेनुसार लग्नासाठी जळगाव येथून मुलगा आणि नातेवाईक मुलीच्या घरी ताकमोडवाडी येथे आल्यावर त्यांचा पाहुणचार करण्यात आला. मुलगी लग्नासाठी नटून तयार झाली. ठरलेली १ लाखाची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने वराडी मंडळीकडून मुलीला देण्यात आले. रक्कम आणि दागिने ताब्यात मिळाल्यावर मुलीकडील लोकांनी रचलेल्या कटानुसार वराडी मंडळीवर मिरची पावडर टाकत मुलीसह सर्व जण पसार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *