गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जावई नावाला कलंक, अल्पवयीन मेव्हणीसोबत असं कृत्य केलं, ऐकून सगळेच हादरले

उत्तर प्रदेशातल्या कौशांबी जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. तिला झालेल्या मुलाची तस्करी करण्याचा प्रयत्न झाल्याचंही उघडकीस आलं आहे. ती गर्भवती झाल्यावर तिच्या पोटात ट्यूमर झालेला असू शकेल, असं तिच्या कुटुंबीयांना खोटंच सांगून एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिची डिलिव्हरी करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराची माहिती कळताच सीडब्ल्यूसीने (बालकल्याण समिती) पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले.

सीडब्ल्यूसीने दखल घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चरवा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही घटना घडली आहे. एसपी ब्रजेशकुमार श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

चरवा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एक अत्यंत गरीब कुटुंब राहतं. गरीब आणि निरक्षर असलेल्या या दाम्पत्याने सात मुलांना जन्म दिला. त्यांचं पोट भरण्याची चिंता असल्याने त्यांना शिक्षण मात्र दिलं नाही. सध्या त्या सात भावंडांपैकी दोन भाऊ दिल्ली आणि मुंबईत मजुरी करतात. त्यातून तीन बहिणींच्या लग्नाचं कर्ज फेडतात. दोन मुली अद्याप अल्पवयीन असल्याने घरीच असतात. सहावी मुलगी मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. असं अत्यंत कष्टप्रद जीवन असूनही हे कुटुंब कष्ट करून चार घास सुखाने खाऊन गुजराण करत होतं; मात्र त्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली.

पाच वर्षांपूर्वी या दाम्पत्याच्या पाचव्या क्रमांकाच्या मुलीचा राजन नावाच्या मद्यपी व्यक्तीशी विवाह झाला. त्याचे अत्याचार सहन न झाल्याने ती कोणा अज्ञात तरुणाबरोबर पळून गेली. तिचं लहान बाळ तिने घरीच सोडलं. आपली मुलगी सासरहून पळून गेल्याने त्या बाळाला अखेर तिच्या माहेरी आणलं गेलं. त्या बाळाचा पिता आणि त्या कुटुंबाचा जावई राजन आपल्या बाळाला भेटायला कधी तरी येत असे. फेब्रुवारी 2023मध्ये सासू-सासरे कामाला गेलेले असताना जावई राजन सासरी आला आणि घरी असलेल्या आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर त्याने जबरदस्तीने बलात्कार केला. तिने कोणाला काही सांगू नये, म्हणून तिला घाबरवण्यात आलं. तिने जेव्हा हे सांगितलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता, असं पीडितेची आई म्हणाली. राजनने सुरुवातीला तिच्या पोटात ट्यूमर झाल्याची शक्यता वर्तवून दिशाभूल केली. एका हकिमाकडून त्याने जडी-बूटीदेखील खाऊ घातली. अखेर पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतरच तिच्या पोटाचा आकार वाढणं थांबलं.

पीडितेने सांगितलं, ‘भाऊजी (आरोपी राजन) घरी आला, तेव्हा मी त्यांच्याच बाळाला भरवत होते. तो नशेत होता. त्याने पाणी मागितलं, म्हणून दुसऱ्या खोलीत गेला, तेव्हा त्याने तोंड दाबलं आणि दुष्कृत्य केलं. याबद्दल कोणाला सांगितलं, तर रेल्वेच्या रुळांवर फेकून मारून टाकण्याची धमकी दिली. म्हणून मी गप्प राहिले. आई आणि बहिणीने अनेकदा विचारूनही काही सांगितलं नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *