भाळवणी: सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय वसंतरावदादा काळे यांच्या 22 व्या पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी ( 9 फेब्रुवारी) दुपारी 2 नंतर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या […]
ताज्याघडामोडी
बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याने वाद, बालपणीच्या जिवलग मित्राकडून मित्राची हत्या
बहिणीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकच्या अंबड परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयितास पोलिसांनी एका तासात अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या सिडको परिसरात कामाटवाडा परिसरात राहणारे आनंद इंगळे आणि […]
वाडीकुरोली येथे वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंत फेस्टिवलचे आयोजन
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सहकारी शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत फेस्टिवलचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी दिली. पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलाबरोबरच शेती, सहकार ,शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रात वसंत दादांनी केलेले कार्य आपल्या […]
शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध, 21 हजार पदांची बंपर भरती; मुलाखत न देताही मिळणार नोकरी
शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. तब्बल 21 हजार जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षक विभागानं प्रसिद्ध केलीय. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा संपलीय. राज्यातील शिक्षकांची भरती लवकरच होणार आहे. शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शालेय […]
लोकसभे बरोबरच विधानसभांच्या निवडणुका घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पाठींबा
देशात लोकसभा निवडणुकांच्या बरोबरच विधानसभा निवडणुकाही एकत्र घेतल्या जाव्यात आणि ‘एक देश एक निवडणूक’ प्रक्रियेला सुरुवात करावी अशा पद्धतीची चर्चा केंद्रात सुरू आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीने राजकीय पक्षांकडून अभिप्राय मागवले होते. त्यानुसार देशभरातील विविध पस्तीस राजकीय पक्षांनी यासंदर्भात आपला अभिप्राय सदर समितीला पाठवला आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोविंद […]
‘…तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा
आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. या सगळ्यात बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी उभ्या राहणार […]
पेटीएमवर आरबीआयच्या कारवाईनंतर व्यापारी संघटनेनं व्यापाऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला
रिझर्व्ह बँकेनं पेटीएमवर नुकत्याच घातलेल्या निर्बंधांमुळं, देशभरातील पेटीएम वापरणारे व्यापारी त्यांच्या पैशांबाबत अत्यंत चिंतित आहेत. त्याअंतर्गत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेनं देशभरातील पेटीएम वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिलाय. पेटीएम वापरकर्त्यांनी त्यांच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी आणि कोणतंही नुकसान न होता त्यांचे आर्थिक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असं म्हटलंय. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
घरातून पळून गेले, विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन
वर्धा जिल्हा चांगलाच हादरला आहे. पारडी गावातील घटना कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या सुन्न झालंय. कारण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलाने काही दिवसांपूर्वी पलायन केलं होतं. दाखल केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पारडी […]
शासकीय निधी लाटण्यासाठी बनावट सामूहिक विवाह सोहळा; नवरदेव कमी पडल्याने भांडाफोड
लोककल्याणासाठी सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. गरजू जनतेला मदत करण्याच्या उद्देशाने या योजना सुरू केल्या जातात. मात्र, अनेकदा ज्यांना खरोखर मदतीची गरज असते त्यांना या योजनांचा लाभ न मिळता भलत्याच व्यक्ती सरकारी पैशांवर डल्ला मारतात. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात असंच एक प्रकरण समोर आलं आहे. तिथे सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस सामूहिक विवाह सोहळा आयोजित […]
आता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार माध्यान्ह भोजन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार केला जाणार आहे. राज्यात सध्या इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळत होता. आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या […]