गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नियम मोडून धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न पार पडलं. याविरोधात महापालिकेने कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं समजतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचे बळी जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीतील साहसी युवकांची प्रेरणादायी कामगिरी

गतवर्षी आपल्या पंढरपूर शहरात कोरोनाची पहिली लाट आली असताना महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी शहरातील अनेक कोरोनाग्रस्त पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अनमोल सहकार्य केलेले होते. व आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहर व तालुक्यातील अनेक नागरीकांना आपल्या कवेत घेतल्यानंतर संवेदनशील मनाच्या विशाल आर्वे या युवकास स्वस्थ बसवेना. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंताग्रस्त बनलेली शहरातील परिस्थिती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर नागरी हिवताप योजना

जागतिक हिवताप दिन आज सर्व जगात पुन्हा एकदा कोरोना (कोव्हीड-१९)या महामारीने थैमान घातले असून भारतामध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग होणार विषाणू (व्हायरस) हा अत्यंत घातक असून यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीस वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत व त्वरित निदान व उपचार न केल्यास प्रसंगी मृत्यू ओढू शकतो. या सर्व परिस्थितीत सर्व नागरिक,प्रशासन यांनी भारत सरकार, […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प-अभिजित पाटील

राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निमित्तीचा ❝पायलट प्रोजेक्ट❞ प्रकल्प आपल्या धाराशिव साखर कारखान्यावर करण्याचे निश्चित झाले. आज वसंतदादा इन्स्टिट्यूटने घेतलेल्या झूम मिटींगमध्ये राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली होती.यामध्ये धाराशिव साखर कारखाना युनिट १,२ व ३ चे चेअरमन अभिजित पाटील हेही सहभागी झाले होते.              सध्या कोविडच्या दुस-या […]

ताज्याघडामोडी

ऑक्सिजन टॅंकरवरून कोल्हापूर-सातारा जिल्हाधिकाऱ्यांत तब्बल चार तास खडाजंगी!

कोल्हापूर: राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना सातारा येथे आलेला ऑक्‍सिजनचा टॅंकर कोल्हापूरसाठी कि सातारासाठी यावरून बराच वाद झाला. चार तास दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या वादावादीनंतर अखेर हा टॅंकर सातारा येथेच नेण्यात आला आणि सातारा जिल्हा रुग्णालयात तो खाली करण्यात आला. सध्या राज्यात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनची मोठी टंचाई आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऑक्‍सिजनचा टँकर दिला जात […]

ताज्याघडामोडी

केंद्र सरकारचा निर्णय ! देशातील 80 कोटी जनतेला मे, जूनमध्ये मोफत अन्नधान्य

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पुढील दोन महिने (मे आणि जून) देशातील गरीब आणि गरजूंना 5 किलो मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. त्यातून करोना फैलाव रोखण्यासाठी बहुतांश राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब, गरजूंना […]

ताज्याघडामोडी

झायडसच्या Virafin ला डीसीजीआयची मंजुरी

देशभरात कोरोनाचा फैलाव वाढव आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला गती देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील ड्रग्स रेग्युलेटरने (डीसीजीआय) कोरोनाशी लढण्यासाठी Zydus च्या Virafin ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळणार आहे. Virafin चा उपयोग कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे. डीसीजीआयने शुक्रवारी Virafin च्या वापराला मंजुरी दिली आहे. चाचण्यांमध्ये याचे सकारात्मक परिणाम […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढयात 25 बेडचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार   पालकमंत्री-दत्तात्रय भरणे

मंगळवेढयात 25 बेडचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार   पालकमंत्री-दत्तात्रय भरणे     पंढरपूर, दि. २३: मंगळवेढा तालुक्यातील कोरोना बाधित गरीब व गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी  शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेड सर्व सुविधायुक्त डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत तहसिल कार्यालय, […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील नागरीकांसाठी कोव्हिड 19 ची लस, ऑक्सिजन व रेमडीसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत-नगराध्यक्षांची पालकमंत्र्याकडे मागणी

आज पंढरपूर येथे कोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी मिटिंग आयोजित केली होती या यावेळी नगराध्यक्ष च्या वतीने माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले पक्षनेते गुरदास अभ्यंकर सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील […]