ताज्याघडामोडी

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत, तर गोव्यात भाजपा मोठा पक्ष

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा ५९ […]

ताज्याघडामोडी

यूपीत पुन्हा कमळ फुलणार; भाजपला २४० जागा मिळण्याचा अंदाज

उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत. भाजपने निवडणुकीत विजय मिळवून पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही भाजपने हाच दावा केला आहे. पंतप्रधान मोदींनीही उत्तर प्रदेशात अनेक प्रचारसभा घेतल्या. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभांनाही मोठी गर्दी झाल्याचे दिसून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीला मेकअप नाही आवडला; पालिकेच्या अभियंत्यानं थेट ब्युटी पार्लरवर बुलडोझर चालवला

हरयाणाच्या गुरुग्राममध्य एक अजब घटना घडली आहे. महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्यानं एका सलूनवर बुलडोझर चालवला आहे. सलूनमध्य कोणतंही बेकायदेशीर काम चाललेलं नव्हतं. अतिक्रमणदेखील झालेलं नव्हतं. पण तरीही अभियंत्यानं सलूनवर तोडक कारवाई केली. कनिष्ठ अभियंत्याची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी गेली होती. पत्नीला मेकअप आवडला नाही. त्यामुळे अभियंत्यानं सलूनवर थेट बुलडोझर चालवला. प्रकरण चर्चेत येताच प्रशासनानं अभियंत्यावर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करुन युवकाने स्वतः विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. आरोपीनेही विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात […]

ताज्याघडामोडी

दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या तीन भावांना ट्रकने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने दुचाकीला जोरदार टक्कर दिली. या अपघातामध्ये तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. खटखरी पोलीस स्थानकाचे सब-इन्स्फेक्टर प्रज्ञा पटेल यांनी सांगितले की, तिघे भाऊ दहावीची अंतिम परीक्षा देऊ घरी परतत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने […]

ताज्याघडामोडी

फडणवीसांच्या गाडीवर भिरकावली चप्पल, राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे.  या कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी तणाव निर्माण झाल्यानंतरे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला होता. याआधी एका कार्यक्रमादरम्यान […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पठ्ठ्याने साडेतीन एकरांत फुलवली अफूची शेती, गोण्या भरून पोलिसांची दमछाक

जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वाळकी याठिकाणी एका शेतकऱ्यानं साडेतीन एकरावर अफूची शेती लावली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली असता, संबंधित प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून पोलीस अफूचं पीक उपटण्याचं काम करत आहेत. आतापर्यंत एक हजार गोणी अफू उपटला आहे. अजूनही अंदाजे 500 गोणी […]

ताज्याघडामोडी

तोंडी परीक्षेहून परत येताना काळाने केला घात

नागपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येत असताना एका विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. या विद्यार्थ्याच्या बाईकला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक यामध्ये बाईकवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर हि दुर्दैवी घटना घडली […]

ताज्याघडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोपीचंद पडळकर पुन्हा मैदानात, आझाद मैदानात पुकारला एल्गार

कालच एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल कोर्टात दिल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. सुरूवातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्वात आमदार पडळकर यांनी केलं होतं, परबांच्या या माहितीनंतर आता गोपीचंद पडकर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसह जमत पडळकरांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. पुन्हा आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. एसटी […]

ताज्याघडामोडी

हवामान विभागाचा इशारा! राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोसळणार पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गरमीचे प्रमाण वाढले आहे. ऊन देखील जास्त प्रमाणात जाणवत होते. पण हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गरमी पासून दिलासा मिळणार आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात येत्या ३ ते ४ तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.   या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता- राज्यातील […]