ताज्याघडामोडी

हवामान विभागाचा इशारा! राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोसळणार पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गरमीचे प्रमाण वाढले आहे. ऊन देखील जास्त प्रमाणात जाणवत होते. पण हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे.

त्यामुळे नागरिकांना गरमी पासून दिलासा मिळणार आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात येत्या ३ ते ४ तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता-

राज्यातील धुळे, नाशिक, आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या ३ ते ४ तासात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विजांच्या कडकड्यासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३ मार्च रोजी सायंकाळी ते ५ मार्च या कालावधीपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्याचदरम्यान तामिळनाडू , पुडुचेरी आणि कराईकलसह दक्षिणेकडील भारताच्या काही द्वीपकल्पीय भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *