ताज्याघडामोडी

यूपीत पुन्हा कमळ फुलणार; भाजपला २४० जागा मिळण्याचा अंदाज

उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत. भाजपने निवडणुकीत विजय मिळवून पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला आहे.

भाजपने गेल्या निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही भाजपने हाच दावा केला आहे. पंतप्रधान मोदींनीही उत्तर प्रदेशात अनेक प्रचारसभा घेतल्या. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभांनाही मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

तर काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनीही जोरदार प्रचार केला. बघूया यूपी निवडणुकीचा एग्झिट पोल.

एकूण जागा – ४०३

भाजप – २४०

समाजवादी पक्ष – १४०

बहुजन समाज पक्ष – १७

इतर – ६

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?

एकूण जागा – ४०३

भाजप – ३१२

समाजवादी पक्ष – ४७

बहुजन समाज पक्ष – १९

काँग्रेस – ७

अपना दल – ९

सुभासप – ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *