ताज्याघडामोडी

भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न;

नागपूरः नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भाजयुमोनं आक्रमक पवित्रा घेतला असून यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच घेरलं आहे. राज्यात लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बील आले आहेत. वीज बिलातून ग्राहकांना सूट द्यावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी भाजपनं वाढीव वीज बिलाच्या […]

ताज्याघडामोडी

भास्कर पेरेंवर अखेर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श गाव पाटोद्याचे (जि. आैरंगाबाद) माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केल्याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अखेर पेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी फिर्याद दिली आहे. ३१ जानेवारीला जामखेड तालुक्यातील मोहा येथील ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृहातील एका […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांचा संशयास्पद मृत्यू

गोकुळ शुगर उद्योगाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह सोलापूर येथे रेल्वे रुळांवर आढळून आला. शिंदे यांच्या मृत्युमुळे एकच खळबळ उडाली असून, ही हत्या की आत्महत्या याबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलीस मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत. ही घटना आज (सोमवार, 8 फेब्रुवारी 2021) सकाळी घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या धोत्री येथील गोकुळ शुगर उद्योगाचे भगवान […]

ताज्याघडामोडी

तिसर्‍यांदा स्थलांतरीत पक्षाचा संशयास्पद मृत्यू उपरीच्या कासाळ ओढ्यातील घटना; त्या पक्षांचा अहवाल प्रलंबीत

पंढरपूर – गेल्या काही दिवसांपासून उपरी ता.पंढरपूर येथील कासाळ ओढ्यामध्ये स्थलांतरीत रंगीत करकोचा या पक्षाचा संशयास्पद मृत्यू होत आहे. यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपुर्वी संशयास्पद मृत्त पावलेल्या पक्षाचा अहवाल पुणे मार्गे भोपाळ येथे गेला आहे. अद्यापही हा अहवाल प्रलंबीत  असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सोमवारी पुन्हा एका […]

ताज्याघडामोडी

कोरोना योद्ध्याच्या सन्मानासाठी तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर राजकारणाच्या पलीकडेही ‘ माणुसकीचा धागा ‘ मजबूत :  आ प्रशांत परिचारक

 ढरपूर / प्रतिनिधी : कोरोना महामारी च्या संकटाने माणुसकी शिकवली आणि याचा गौरव करण्यासाठी भालके – परिचारक आणि अवताडे यांना एकाच धाग्यात गुंफत राजकारणाच्या पलीकडे जाऊन ‘ माणुसकीचा धागा ‘  जोडता येतो हे देखील या कार्यक्रमात वरून दिसून आले असे उद्गार आ. प्रशांत परिचारक यांनी काढले.  बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठान च्या वतीने […]

ताज्याघडामोडी

शिरीष कटेकर मारहाण प्रकरणी आ.राम कदम यांची संतप्त प्रतिक्रिया 

भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी महावितरण कार्यालयामसोर टाळे ठोको आंदोलनावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अतिशय भडक व वैयक्तिक पातळीवरील टीका करणारे वक्तव्य केले होते.त्यामुळे दोन दिवस शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागिरकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत होता तर अनेक सुजाण नागिरकही व्यक्तिगत पातळीवरील टीका आयोग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.सरते शेवटी काल उद्रेक झाला आणि शिरीष कटेकर याना मारहाण करीत काळे फासण्यात […]

ताज्याघडामोडी

भाजपला धक्का, 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई, 6 फेब्रुवारी : भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हेमेंद्र मेहता भाजपच्या चिन्हावर तीनवेळा पूर्वीच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मेहता यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या […]

ताज्याघडामोडी

पोलीस हवालदार इकबाल शेख यांना मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे हस्ते मुंबई येथे राष्ट्रीय पारितोषिक प्रदान

पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस व आयसीजेएस या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेवून वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय पारितोषिक मिळविले आहे त्याबद्दल दिनांक 04 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे मा. हेमंत नागराळे, नूतन पोलीस महासंचालक, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून मारहाण

बीड : खळबळजनक बातमी बीडमधून. मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला बेदमपणे मारहाण करत रात्रभर बांधून ठेवले. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. मुलाच्या हव्यासापोटी स्वत:च्या पत्नीला डांबूने रात्रभर बेदम मारहाण केल्याने अती रक्तस्त्राव होवून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगपूर शिवारात घडली. या घटनेने संताप व्यक्त होत आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पत्नीला आता मुल होणार नाही. […]

ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या ”त्या” वक्तव्याने पंढरपूर तालुक्यातील पक्ष प्रवाशांना रेड सिग्नल

२०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेद्वारा विरोधात काम केलेला नेता मग तो कोण आहे याची फिकीर न करता त्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली.       […]