ताज्याघडामोडी

भास्कर पेरेंवर अखेर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श गाव पाटोद्याचे (जि. आैरंगाबाद) माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केल्याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अखेर पेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी फिर्याद दिली आहे.

३१ जानेवारीला जामखेड तालुक्यातील मोहा येथील ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृहातील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात पेरे यांनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या झालेल्या पराभवाच्या रागातून पत्रकारांना हलकट, हरामखोर असे म्हटले होते. जामखेडमधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत या वक्तव्याचा तीव्र निषेध करत तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

४ फेब्रुवारीला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई हे जामखेडमधील पोलिस वसाहतीच्या भूमिपूजनासाठी आले होते. त्यांच्यासमवेत आमदार रोहित पवारही होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *