ताज्याघडामोडी

तिसर्‍यांदा स्थलांतरीत पक्षाचा संशयास्पद मृत्यू उपरीच्या कासाळ ओढ्यातील घटना; त्या पक्षांचा अहवाल प्रलंबीत

पंढरपूर – गेल्या काही दिवसांपासून उपरी ता.पंढरपूर येथील कासाळ ओढ्यामध्ये स्थलांतरीत रंगीत करकोचा या पक्षाचा संशयास्पद मृत्यू होत आहे. यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपुर्वी संशयास्पद मृत्त पावलेल्या पक्षाचा अहवाल पुणे मार्गे भोपाळ येथे गेला आहे. अद्यापही हा अहवाल प्रलंबीत  असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सोमवारी पुन्हा एका स्थलांतरीत पक्षाचा संशयास्पदरीत्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.
 गादेगांव, वाखरी येथील ओढ्यांसह उपरी येथील कासाळ ओढा व पंढरपूर येथील यमाई तलाव परिसरात दुर्मिळ होत जाणारे, विविध रंगाच्या छटा असलेले स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने पहावयास मिळतात. रंगित करकोचा हा दिसायला अंत्यंत आकर्षक व देखणा असुन मासे हे त्याचे प्रमुख खाद्या आहे. राज्यामध्ये र्ब्डफ्लूचे सावट आहे. बुधवार दि. 3 फेबु्रवारी रोजी सायंकाळी कासाळ ओढ्याजवळ व ओढ्यातील एकाच विहिजवळ रंगित करकोचा मृत्य पावल्याचे आढळले. सलग दुसर्‍या दिवशी संशयास्पदरीत्या या पक्षाचा मृत्यू झाल्याचे आढळल्यानंतर ग्रामस्थांनी त्वरीत वनविभाग व पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधला. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. एक मृत पक्षी वनविभागाचे वनपाल सुनिता पत्की या स्वत: पुणे येथे तपासणीसाठी घेवून गेल्या.  पुणे येथून तो पक्षी अधिकच्या तपासणीसाठी शुक्रवार दि. 5 फेबु्रवारी भोपाळकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्रलंबित आहे. परंतु सोमवारी पुन्हा संशयास्पद रित्या तिसरा पक्षी मृत आढळून आला आहे. जो पर्यंत पहिल्या पक्षाचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्श काढणे शक्य नसल्याचे पशुधन विकास आधिकारी डॉ. प्रविण खंडागळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह ओढ्यालगतच्या शेतकर्‍यांची चिंता मात्र चांगलीच वाढली असून अहवालाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.

जलयुक्तच्या कामामुळे ओढ्याचे पात्र वाढले आहे. त्यामुळे ओढ्याला सतत पाणी राहत आहे. या पाण्यातील मासे खाण्यासाठी मोठ्या संख्येने स्थलांतरीत पक्षी ओढ्याकठी जमा होतात.  दुर्मिळ होत जाणार्‍या या पक्षांची ग्रामस्थ निगा राखून त्यांच्यावर नेहमीच देखरेख ठेवत असतात. त्यामुळे पक्षांच्या संशायास्पद मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
– महेश नागणे, ग्रा.पं.सदस्य.उपरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *