विनयभंगाचा आरोप फेटाळून लावत व्हिडिओद्वारे तसेच सुसाईट नोटमधून थेट आत्महत्येचा इशारा देणारे सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे (२०) हे गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असून तरीही त्यांचा शोध लागत नसल्याने विनयभंग प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. गेवराई तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे हे विनयभंग, बाललैंगिक […]
ताज्याघडामोडी
फास्टॅगच्या नियमात ‘मोठा’ बदल
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅमध्ये किमान रक्कम ठेवण्याची अट समाप्त केली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये आणि फास्टॅगचा वापर वाढावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. फास्टॅग वॅलेट काढतेवेळी डिपॉझिट ठेवले जाते. त्याच बरोबर वाहन धारकाला किमान रक्कम ठेवण्याची अट बॅंकाकडून घालण्यात येत आहे. आता किमान रकमेची अट रद्द करण्यात आली आहे. प्राधिकरणाने म्हटले […]
एफआरपी थकवलेल्या साखर कारखान्याचे संचालक ठरणार सरकारी थकबाकीदार ?
राज्यात साखर कारखाने सुरू होऊन 4 महिने उलटून गेले. तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम न देता मोडतोड करून शेतकर्यांना रक्कम दिलेली आहे. तसंच गतवर्षीची एफआरपीची रक्कम अद्यापही काहींनी दिलेली नाही. या सर्व साखर कारखान्यांवर तातडीने साखर जप्तीची कारवाई करावी,’ अशी मागणी […]
देवकार्य करण्याचा बहाणा करून महिलेचा निर्घृण खून
देवकार्य करण्याचा बहाणा करत सोने लुटण्याच्या हेतून कोल्हापुरात 80 वर्षाच्या महिलेचा जाळून मृतदेह कापून निर्घुण खून केल्याची घटना आज सकाळी कोल्हापूरच्या राजराम तलाव परिसरात घडली होती. या खून प्रकरणाचा तापस आव्हानात्मक होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने तपास करत छिन्न विच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवली. शांताबाई शामराव आगळे या 80 वर्षीय मृत महिलेचं नाव असून या खून […]
पंढरपूर तालुक्यात 1 हजार 309 नोंदीचे निर्गतीकरण- प्रांताधिकारी-सचिन ढोले
पंढरपूर, दि. 09:- फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत 1 हजार 309 नोदींचे निर्गतीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. जिल्ह्यासह तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी दिनांक 1 ते 10 फेब्रुवारी […]
पूरग्रस्त निधी तातडीने जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू बळीराजाचा इशारा
पंढरपूर तालुक्यातील गेल्यावर्षी भीमा नदीला आलेल्या महापुराने सुमारे 700 नुकसानग्रस्त शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वंचित आहेत व यावर्षी ही अवकाळी व महापुरामुळे नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी पंचनामे होऊन सुद्धा वंचित आहेत पंढरपूर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार झालेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलआहे एकीकडे निधी दिला म्हणून सरकार पाठ थोपटून घेत असताना पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मात्र […]
ग्राहक बनून आला अन् सोन्याचा बॉक्स घेऊन पसार झाला…
मुंबई: कांदीवली परिसरातील एका सराफाच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. एक व्यक्ती सराफाच्या दुकानात ग्राहक बनून आला आणि सोन्याचा बॉक्स घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी कांदीवलीतील चारकोप पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या चोराचा तपास घेत आहेत. कांदीवलीच्या चारकोप परिसरातील भारत भूषण इमारतीतील पद्मावती ज्वेलर्समध्ये एक व्यक्ती ग्राहक बनून आला. […]
आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा
ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. […]
स्वेरी इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाइन ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाकडून मागील पाच दिवसापासून सुरु असलेल्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’चा समारोप करण्यात आला. यामध्ये संशोधक व प्राध्यापकांनी ‘व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही अटल (एआयसीटीई, ट्रेनींग अँड […]
सुजय विखे पाटील-रोहित पवार यांची छुपी युती
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेची येत्या 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्हा बॅंकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कुरघोड्यांना उधाण आले आहे. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्या छुप्या युतीमुळे जगन्नाथ राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु […]