ताज्याघडामोडी

संयम संपला, कधीही दुकाने उघडतील’, पुण्यातील व्यापारी संघटनांचा इशारा

राज्यात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमधील कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांचा फटका छोटे व्यापारी आणि व्यवसायिकांना बसताना पाहायला मिळतोय. अशावेळी व्यापारी वर्गाकडून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आलाय. (Pune trade unions warn state government […]

ताज्याघडामोडी

अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या, जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर, 7 एप्रिल: अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून निर्घृण हत्या (Journalist Murder Case) करण्यात आली आहे. रोहिदास दातीर यांची हत्या झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

नाशिक, 07 एप्रिल : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (satana) साक्री रोडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNA) एका पदाधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारमध्येच त्यांनी डोक्यात गोळी झाडून जीवनयांत्रा संपवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नंदू ऊर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय 55) (Nandu ganpat shinde) […]

ताज्याघडामोडी

हे तर खंडणी वसूल करणारं सरकार : – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात

हे तर खंडणी वसूल करणारं सरकार : – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात माझी जबाबदारी वीज बिल भरायची, माझी जबाबदारी कोरोनामुक्त व्हायची, माझी जबाबदारी सुरक्षित राहायची मग सरकारची जबाबदारी काय? खंडणी वसूल करायची एवढीच का? असा सवाल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. राज्याचे माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील बुधवारी पंढरपूर दौऱ्यावर […]

ताज्याघडामोडी

धाराशिवच्या असावनी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचा उस्मानाबाद- कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

*धाराशिवच्या असावनी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचा उस्मानाबाद- कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*   पंढरपूर प्रतिनिधी: धाराशिव साखर कारखाना लि.युनिट१ चोराखळी उस्मानाबादच्या ४५ केएलपीडी असावनी व इथेनॉल प्रकल्पाचे वास्तुपुजन उस्मानाबाद- कळंबचे आमदार श्री.कैलासदादा पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. धाराशिव साखर कारखान्याने नवा उपक्रम हाती […]

ताज्याघडामोडी

भुमीपुत्र असणाऱ्या अवताडेकडून दामाजी कारखाना प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा उद्योग अड नंदकुमार पवार

भुमीपुत्र असणाऱ्या अवताडेकडून दामाजी कारखाना प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा उद्योग अड नंदकुमार पवार  मंगळवेढा  तालुका प्रतिनिधी भूमिपुत्र म्हणवून घेणाऱ्या समाधान आवताडे यांनी  दामाजी कारखान्याच्या 19500 सभासदांचे सभासदत्व रद्द करून  स्वताचा खाजगी कारखाना करण्याचा खटाटोप सुरू असून त्यांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अड नंदकुमार […]

ताज्याघडामोडी

कोणाचेतरी कपडे घालून,  कुणासारखं दिसलो म्हणून आमदार होता येत नाही –  आ.प्रशांत परिचारक

कोणाचेतरी कपडे घालून,  कुणासारखं दिसलो म्हणून आमदार होता येत नाही –.   आ.प्रशांत परिचारक      मंगळवेढा – पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा झाली.  रांझणी या गावात विराट अशा सभेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांचे शोषण करणारे,जनतेची दिशाभूल करणारे हे सरकार —  माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख

शेतकऱ्यांचे शोषण करणारे,जनतेची दिशाभूल करणारे हे सरकार —  माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख  भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार समाधान आवताडे यांची तावशी या गावात प्रचार सभा झाली या सभेला राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार देशमुख यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या […]

ताज्याघडामोडी

लॉकडाऊन रद्द करा अन्यथा याकाळात गोरगरीब व्यावसायिकांसाठी शासकीय अनुदान द्या.-आ.परिचारक

  महाराष्ट्र शासनाचे दि.5/4/2021 रोजीचे आदेशानुसार 30 एप्रिल अखेर अत्यावश्‍यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर झाल्याने पंढरपूर येथील गोरगरीब कष्टकरी व व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने आ.प्रशांत परिचारक यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीससाहेब यांचेशी संपर्क साधला व मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांना पत्राव्दारे लॉकडाऊन रद्द करा अन्यथा त्यांना उदरनिर्वाहासाठी शासकीय अनुदान द्या अशा प्रकारची पत्राव्दारे मागणी केली. आ.प्रशांत परिचारक म्हणाले, लॉकडाऊन हा कोरोना प्रादुर्भाव रोखणेचा पर्याय नाही, अनेक गोष्टी पैंकी तो एक भाग आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट हे मुख्य कोरोना प्रादुर्भाव रोखणेचे काम प्रशासनामार्फत केले जात आहे. त्यामध्ये सर्व जनता मास्क, सॅनिटायझर आदींसह सहकार्य करीत असताना लॉकडाऊन करणे चुकीचे आहे. त्यातच तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार वाऱ्यावर जगणारे गाव आहे, वर्षभरातील वारी रद्द झालेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. पुन्हा एकदा शासनाने विठुरायाचे मंदिर बंद केलेमुळे सुरळीत होणारी आर्थिक व्यवस्था पुन्हा विस्कळीत होणेची चिन्हे निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत याचा फटका मंदिरावर अंवलबून असणाऱ्या लहानमोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी, हारफुले विक्रेते, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगावाले, दैनंदिन कामकरून रोजगार करणारे गोरगरीब मजूर अशा सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. याबाबत पंढरपूरातील व्यापारी संघटना, सर्वसामान्य व्यावसायिक यांचेमध्ये महाविकासआघाडी सरकार विरूध्द प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीनारायण भट्टड यांचेकडे आ.प्रशांत परिचारक, भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.समाधान आवताडे, आ.रणजीतसिंह मोहितेपाटील, रोंगे सर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांचेसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेसमवेत आ.परिचारक यांनी फोनव्दारे चर्चा घडवून आणली, त्यांचे सूचनेनुसार तत्काळ मा.मुख्यमंत्री महोदयांना लॉकडाऊन रद्द करणेबाबत पत्रही पाठविण्यात आले.   आ.परिचारक पत्राव्दारे मागणी करताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन सुरू ठेवणार असल्यास पंढरपूरातील अशा कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी लॉकडाऊन काळात उदरनिर्वाहासाठी शासकीय अनुदान देणेत यावे, याबाबत शासनस्तरावर त्वरीत निर्णय व्हावा अन्यथा लॉकडाऊन रद्द करून मंदिर पुर्ववत सुरू ठेवणेत यावे. आ.प्रशांत परिचारक यांचे भूमिकेमुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.