पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कोयता गँगच्या उच्छादानंतर आता आता दिवसाढवळ्या पुण्यात खून होत आहे. अशातच पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. त्यातच एका खुनाच्या प्रकारात कोंढवा पोलिसांनी एका आरोपीला अवघ्या आठ तासात बेड्या ठोकल्या आहेत. ९ जानेवारी रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या […]
ताज्याघडामोडी
पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अख्ख्या पोलीस स्टेशनलाच लावली आग
बिहारच्या दरभंगा येथील मोरो पोलीस ठाणे रविवारी रात्री काही समाजकंटकांनी पेटवून दिले. पोलीस ठाण्यातच पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. समाजकंटकांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकीही दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बॉक्समधून काही ज्वलनशील पदार्थ फवारताना दिसत आहे. फवारणी करून […]
प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या !
आधुनिक काळातही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली असून प्रेमविवाहाला असलेल्या विरोधातून वडील आणि भावाने तरुणीसह तिच्या पती आणि मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील गोपाळपूर परिसरात राहणाऱ्या चंदा देवी आणि चंदन कुमार […]
मोठ्या कंपनीतील अधिकारी आईने नवऱ्याचा राग काढला मुलावर, 4 वर्षांच्या चिमुकल्याला क्रूरपणे संपवलं
आई आपल्या मुलांनी पहिली रक्षक असते, असं म्हणतात. आपल्या मुलांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आई अगोदर सामोरं जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, कर्नाटकमधील एक आई स्वत:च्या मुलाच्या जीवावर उठली. सूचना सेठ, असं या महिलेचं नाव आहे. गोवा पोलिसांनी बेंगळुरूची रहिवासी असलेल्या सूचनाला तिच्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. ती एका कंपनीची सीईओ आहे. तिने कँडोलिममधील […]
भावजींचा गेम वाजवायचा, शहापुरात मेहुण्याने कट रचला, हातबॉम्बही तयार, पण ऐनवेळी…
शहापूर येथे एका व्यक्तीच्या हत्येचा कट त्याच्या मेहुण्यानेच रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी राजन यशवंत हरड (३० रा. कुरुंद), पंकेश मधुकर शिंदे (३३ रा. आणे) व महेश मुकुंद चव्हाण (४० रा. भांडुप) यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्येसाठी मेव्हण्याने देशी बनावटीचे हातबॉम्ब, जिलेटीन आणि डिटोनेटर सुद्धा आणले होते. अशी […]
कॉफी कॅफेचा फलक; मात्र आत भलतंच सुरू, पोलिसांना टाकला छापा, समोरील दृष्य पाहून सगळेच हादरले
अहमदनगर: शहरातील तरुणांना अश्लील चाळे करण्यास कॅफे उपलब्ध करुन देणाऱ्या ६ कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पांर्टमेंट बनवून तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेऊन जागा उपलब्ध केली जाते, अशा तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना प्राप्त झाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. […]
15 वर्षांची मुलगी प्रियकरासोबत लग्नासाठी बसली अडून, आईने गोळी झाडून केली हत्या
अल्पवयीन मुलीने प्रियकराशी लग्नासाठी हट्ट केल्यानं आईनेच तिची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या मुलीचे शेजारी राहणाऱ्याच एका मुलावर प्रेम होतं आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. आईने मुलगी हट्ट सोडत नसल्याने गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आईला अटक केली आहे. ज्या पिस्तुलातून गोळी झाडली ते पिस्तुल जप्त […]
उसाला पाणी द्यायचे सांगून शेतात नेलं; अचानक पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकलं, पतीच्या धक्कादायक कृत्यानं गाव हादरलं
चारित्र्यावर संशय घेत पत्नीला उसाच्या शेतात नेऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मलठण येथे शनिवारी पहाटे घडली आहे. गौरी उर्फ सुमन राहुल लोंढे (३५ ) असे या पीडित पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती राहुल विष्णू लोंढे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
चक्क SBI बँकेची बनावट शाखा काढली, 3 महिने चालवली, अधिकारीही चक्रावले
तुमच्या घराजवळ नव्यानेच उघडलेल्या बँकेच्या शाखेत तुम्ही अकाउंट उघडलंय. तुमचे आर्थिक व्यवहारही तुम्ही तिथे करताय. पण ती शाखाच बनावट असल्याचं कळलं तर तुमचं काय होईल? पायाखालची जमीन सरकेल? गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यासाठी आपलं डोकं कुठल्या मर्यादेपर्यंत लढवतात याचा विचार केला तर सर्वसामान्य माणसाची मती गुंग होईल. अशा अनेक घटना गुन्हेगारी वर्तुळातून अधुनमधून समोर येत राहतात. […]
अनैतिक संबंधातून भावंडांनीच जन्मदात्या बापाला संपवलं; आरोपीत अल्पवयीन मुलीचा समावेश
गेल्या काही वर्षात अनैतिक संबंधातून होणारी गुन्हेगारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील लमगाडा भागात घडली आहे. अनैतिक संबंधांमुळे तीन मुलांनी एका मित्राच्या मदतीने जन्मदात्या वडिलांचा जीव घेतला. लमगाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश नाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) मधून निवृत्त झालेले 60 वर्षीय सुंदर लाल यांचा […]