ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीमध्ये दोन दिवसीय इंडस्ट्री एक्स्पर्ट लेक्चर सिरीज संपन्न ‘फार्मा इंडस्ट्री’ आणि ‘टॅबलेट कोटिंग’ मधील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन यावर मार्गदर्शन

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालितकॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दि.०८ सप्टेंबर ते दि.०९ सप्टेंबर २०२४ या दोन दिवसात फार्मसी क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या सत्रात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ॲक्वा ड्राय फार्मा प्रायव्हेट लिमिटेड.’ (जि.ठाणे) या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत सदाफुले हे उपस्थित होते.

          स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला प्रमुख अतिथी म्हणून ॲक्वा ड्राय फार्मा प्रायव्हेट लिमिटेड.’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत सदाफुले हे होते. दीपप्रज्वलनानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ.मणियार यांनी प्रास्तविकात कॉलेज बद्दल माहिती सांगताना म्हणाले की, ‘भारत हा जगाचा फार्मसी हब’ म्हणून ओळखला जाणारा देश आहे. भारतामध्ये फार्मसीच्या क्षेत्रात नवनवीन संशोधने सुरु असतात. त्यामध्ये औषधे तयार करताना वापरल्या जाणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्यातीलच एक टॅबलेट कोटिंग‘ म्हणून ओळखली जाणारी महत्वाची प्रक्रिया सध्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये महत्वाची असून ती अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे उत्तम करिअरचा एक पर्याय म्हणून पाहण्यास हरकत नाही. दिवसेंदिवस फार्मसीचे महत्व वाढत असून ते लोकांना जाणवत देखील आहे, ‘टॅबलेट कोटिंग इंडस्ट्री’ मध्ये सध्या असणाऱ्या मागणीमुळे विद्यार्थ्यांना नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये भारत आणि भारताबाहेर खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ह्या विषयाचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरेल.’ फार्मसी क्षेत्रातील जवळपास २० वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या सदाफुले यांनी फार्मा इंडस्ट्री’ बद्दलची अद्ययावत माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षरित्या कंपनीमध्ये कशा पद्धतीचे कामकाज चालतेऔषध निर्मितीसाठी कोणकोणती साधनेद्रव्ये वापरली जातातकोणत्या प्रक्रिया कोणत्या क्रमाने कराव्या लागतातसध्या फार्मा कंपन्यांची गरज आणि अभ्यासक्रमामध्ये आवश्यक गोष्टी यांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या दिवशी झालेल्या व्याख्यानामध्ये सदाफुले यांनी टॅबलेट कोटिंग’ बद्दलची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. टॅबलेट कोटींग’ म्हणजे नेमके कायत्याच्या पद्धती कोणत्यात्याच्या जुन्या पद्धती व त्यामुळे झालेले तोटेनवीन पद्धती व त्याचे होणारे फायदेतसेच नवीन उपकरणे व त्यांचा वापर कशा पद्धतीने करायचायाबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर टॅबलेट कोटिंग’ मध्ये चालत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियाकाम करताना येणारे अडथळे याचा उत्पादनावर होणारा परिणामप्रॉडक्ट्स मध्ये येणाऱ्या त्रुटी व त्या त्रुटी कमी करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रियाया गोष्टींबाबत सखोल माहिती दिली तसेच त्यांनी फोटोज् व व्हिडिओच्या माध्यमातून प्रात्यक्षिक माहिती दिली.  पुढे  त्यांनी जी. एम. पी.रेगुलेटरी अॅथॉरिटी बद्दल माहिती सांगितली. सदाफुले यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. यावेळी विद्यार्थ्यांना करिअर विषयी असणाऱ्या अनेक प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव यांनी केले तर डिप्लोमा फार्मसी विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र कंदले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *