ताज्याघडामोडी

‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त स्वेरीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वेरीच्या इन डोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ मध्ये बुद्धिबळ आणि बॅडमिंटन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

          स्वेरीच्या स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजिलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीमहिला एकेरीपुरुष दुहेरी व महिला दुहेरी आणि मिश्र अशा प्रकारच्या बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये एकूण १५७ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धांमधून खेळाची चपळतात्यांचा वेगखेळासाठी असलेला उत्साहधोरणात्मक खेळ आणि खिलाडीवृत्ती अशी विविध कौशल्ये दिसून आली. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींचा  सहभाग अधिक होता. या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असलेले भारत अशोक पाटील हे लाभले होते. भारत पाटील यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोच चा दांडगा अनुभव आहे. मलेशियासिंगापूरचायनाथायलंड येथील स्पर्धांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची युरोप मधील बास्केटबॉल अकॅडमी प्रो-प्लेसमेंट प्रोग्रॅम २०-२० मध्ये निवड झाली होती. २००४ पासून राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते गोवा बास्केटबॉल टीमचे कर्णधार म्हणून कार्यरत आहेत. अभ्यासाबरोबर शारीरिक सशक्तता किती महत्त्वाची आहे हे त्यांनी यावेळी पटवून सांगितले. महिला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या नेहा झिरपे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग च्या प्रियांका चव्हाण यांचा पराभव करून अशक्यप्राय असा विजय मिळवला. पुरुष बुद्धिबळ  स्पर्धेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील गणेश दंगेकर यांनी सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील ओम कलुबर्मे यांचा पराभव करून विजय प्राप्त केला. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिलांच्या श्रेणीत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या आश्लेषा काळे यांनी त्यांच्याच विभागाच्या वैष्णवी मेनकुदळे यांचा पराभव केला. बॅडमिंटन महिला सांघिक स्पर्धेमध्ये अस्मिता काळे व आश्लेषा काळे यांनी गीता नवले आणि धनश्री हाके यांचा पराभव करून दमदार विजय प्राप्त केला. पुरुष सांघिक संघामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या समर्थ कुलकर्णी आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या वरद लोकरे यांनी यश कदम व जय गाडेकर यांचा पराभव करून विजय प्राप्त केला. स्पर्धकांनी उल्लेखनीय खेळ करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या यशस्वी खेळाडूंना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखालीकॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारक्रीडा मार्गदर्शक प्रा.संजय मोरे व क्रीडा प्रशिक्षक दीपक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यविद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपतीइतर अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. या संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी बालाजी शेंबडेचैतन्य सोनवणेस्वप्निल भोसलेआदित्य चोरमलेपृथ्वीराज कन्हेरेप्रताप लवळेमनोज शिंदेविजय कारंडेरोहित तांबवेहुसेन मुलाणीसोनाली कांबळेज्ञानेश्वरी मिटकरीज्ञानेश्वरी गोफनेदत्तात्रय आहेरवाडीसचिन करकतगौरी सराटेजुई गोसानेस्वराली नकाते यांचे सहकार्य लाभले. मानसी कंदी व सोनाली कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *