ताज्याघडामोडी

आजच्या युगात ‘आऊट ऑफ द बॉक्स’ पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न

पंढरपूर- प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी चाकोरी बाहेर (आऊट ऑफ द बॉक्स) जाऊन विचार करायला हवाज्यामुळे त्यांच्या नवकल्पनांना चालना मिळते. अशा कल्पना साकारताना त्यांना प्रोडक्टस् मध्ये रूपांतर करणे सोपे जाते. त्यातून विद्यार्थ्यांना नवनवीन स्टार्ट अप्स सुरू करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्प आणि कल्पनांचा समाजासाठी उपयोग कसा होईलयावर लक्ष केंद्रित करावे. एक नोकरी मिळवण्याऐवजी हजारो नोकऱ्या निर्माण करून आपल्या इतर शिक्षित मित्रांच्या हातांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजच्या युगात आऊट ऑफ द बॉक्स‘ पद्धतीने विचार करणे अनिवार्य आहे.‘ असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालकमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी ) माजी सदस्य त्याचबरोबरस्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन. बी. पासलकर यांनी केले.

        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजिलेल्या ऑलम्पस २ के २४‘ या राष्ट्रीय स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर हे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी ऑलम्पस २ के २४‘ चे विद्यार्थी उपाध्यक्ष अनिल पिसे यांनी स्पर्धेसाठी बाहेरून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत केले व ऑलम्पस २ के २४‘ ही स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सोलापूरातील बी.एम.आय.टी. कॉलेज मधील साक्षी पवार यांनी आपल्या मनोगतात स्वेरीने आयोजिलेल्या ऑलम्पस‘ स्पर्धेमुळे आम्हा स्पर्धकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास तसेच आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली तसेच स्वेरी हे शिस्तीसाठी आणि पंढरपूर पॅटर्नसाठी फेमस आहे याचा आज अनुभव आला.‘ स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘ही संस्था ए-आर-टी -आणि पी-पी या पाच शब्दांसाठी ओळखली जाते. ’ म्हणजे उत्कृष्ट शिक्षण, ‘र हे संशोधन साठी तर टी’ म्हणजे टेक्नॉलॉजीत्याचबरोबर आत्ता स्वेरीमध्ये पहिला पी’ हा पेटंटस तर दुसरा पी’ हा प्रॉडक्टस् साठी ओळखला जातो. पुढे त्यांनी सर्व स्पर्धकांचे आभार मानले तसेच विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. स्वेरीतील या दोन दिवसाच्या स्पर्धेच्या आठवणी तुमच्या सोबत कायम राहू द्या,’ असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून जवळपास १ हजार स्पर्धक विविध २३ स्पर्धा प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत जवळपास साठ हजारांची बक्षिसेस्मृतिचिन्हेप्रमाणपत्रे अशी बक्षिसे वितरीत केली तर रोख स्वरूपातील रक्कम विजेत्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखालीकॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार  व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या सहकार्याने विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपतीसंशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. पी. केने, ‘ऑलम्पस २ के २४चे समन्वयक प्रा. दिगंबर काशीदऑलम्पसचे विविध पदाधिकारीविद्यार्थिनी सचिवा नम्रता घुलेप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी ऑलम्पस २ के २४‘ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कांबळे व ज्ञानेश्वरी मेटकरी या विद्यार्थीनींनी केले तर ऑलम्पसचे विद्यार्थी खजिनदार ओंकार जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *