दि.२४ रोजीरात्री हॉटेल बंद करण्यात आल्यानंतर रात्रीच्या वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूकडून पार्कींगच्या गेटचे कूलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आत प्रवेश करून काऊंटरची उचकापाचक करून ३ हजार रूपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा ऐवज लंपास केला.याबाबत वॉचमन आडेप यांच्या फिर्यादीरून कोतवाली पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ताज्याघडामोडी
ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नसल्याने तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
सातारा : प्रजासत्ताक दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.अँट्रोसिटी कायद्याचा अंतर्गत पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत नाही, या कारणाने मनोहर सावंत यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्मदहनकर्ता मनोहर सावंत यांना वेळीच रोखले आणि ताब्यात घेतले. तर दुसरीकडे कण्हेर प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या पिंपरी शहापूर इथे गावातील काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन […]
धाराशिव साखर कारखान्यावर ऊस तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण
समानतेचे तत्व शिकविणारा आपला प्रजासत्ताक दिन ऊस तोडणी कामगारच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.!! धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी उस्म युनिट १, येथे अभिनव पद्धतीने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. सामान्यत: परिसरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करताना अत्यंत आनंद झाला. साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर हा अती महत्त्वाचा असतो हा संदेश जसा दिला गेला तसेच सर्व […]
कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई!
मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलंय. दरम्यान देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक […]
रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्यावे
सोलापूर, दि.25: जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आवारात पुण्यश्लोकअहिल्यादेवींच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यासाठी व अध्यासन केंद्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी या प्रमुख मागण्यासाठी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांचे बेमुदत उपोषण सुरू. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निधी देणार असल्याची घोषणा केली होती.परंतू घोषणेच्या पुढे सरकार जात नाही.त्यामुळे या स्मारकासाठी तात्काळ निधी […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरच्या वतीने शाळा सुरु करणे व मतदान हक्काबाबत जनजागृती फेरीचे आयोजन
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरच्या वतीने शाळा सुरु करणे व मतदान हक्काबाबत जनजागृती फेरीचे आयोजन” श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूरच्या वतीने सोमवार दि.25.01.2021 रोजी सकाळी 9.00 वाजता महाराष्ट्र शासनाने इ.5वी ते 8वी चे वर्ग बुधवार, दि.27.01.2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भातील माहिती पालकांना होण्यासाठी “जनजागृती फेरी” काढण्यात आली. यामध्ये कोरानाच्या […]
हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी 4 तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य
पनवेल, 24 जानेवारी : खारघर गोळीबारातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. कोपरा गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हे आरोपी लूटमार करत असल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. विपीन ठाकूर, गोपाल सिंह, अभिनंदन शर्मा, मुचन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. 24 तासांमध्ये हे […]
ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत- ना.विजय वडेट्टीवार
“एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत. बहुजन कल्याण विभाग मंत्री म्हणून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेल. जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त […]
पंढरपूर कडे येत असताना राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचे गंठण लंपास
राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधना रामचंद्र राऊत रा.भक्तिमार्ग पंढरपूर या रांझणी येथील आपल्या शेतातून पंढपुरातील घराकडे परतत असताना गोपाळपूर रस्त्यावरील कुंभार वीटभट्टी नजीक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसका मारून गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण खेचून गोपाळपूर दिशेने निघून गेला. या बाबत साधना राऊत यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,एक अनोळखी मोटार सायकल चालवणारा […]