तुमच्या घराजवळ नव्यानेच उघडलेल्या बँकेच्या शाखेत तुम्ही अकाउंट उघडलंय. तुमचे आर्थिक व्यवहारही तुम्ही तिथे करताय. पण ती शाखाच बनावट असल्याचं कळलं तर तुमचं काय होईल? पायाखालची जमीन सरकेल? गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यासाठी आपलं डोकं कुठल्या मर्यादेपर्यंत लढवतात याचा विचार केला तर सर्वसामान्य माणसाची मती गुंग होईल. अशा अनेक घटना गुन्हेगारी वर्तुळातून अधुनमधून समोर येत राहतात. […]
ताज्याघडामोडी
अनैतिक संबंधातून भावंडांनीच जन्मदात्या बापाला संपवलं; आरोपीत अल्पवयीन मुलीचा समावेश
गेल्या काही वर्षात अनैतिक संबंधातून होणारी गुन्हेगारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील लमगाडा भागात घडली आहे. अनैतिक संबंधांमुळे तीन मुलांनी एका मित्राच्या मदतीने जन्मदात्या वडिलांचा जीव घेतला. लमगाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश नाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) मधून निवृत्त झालेले 60 वर्षीय सुंदर लाल यांचा […]
आरोग्यसेवेचा वसा घेतलेल्या नर्सनी विश्वासार्हता जोपासावी – डॉ. प्रितिश परिचारक
नर्स रुग्णसेवेचे व्रत आणि आरोग्य सेवेचा वसा जपत असतात त्याचप्रमाणे त्यांनी रुग्णांची व समाजाची विश्वासार्हता जोपासावी, नर्स यांनी रूग्ण संवाद शैली विकसित केली पाहिजे. रूग्ण सेवे सारखे पुण्य नाही असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रितिश परिचारक यांनी केले. कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला यामधे […]
फोनवर बोलत बोलत मुलगा घराबाहेर गेला, दोन दिवस शोधाशोध, मात्र नंतर जे घडलं ते पाहून सगळचे हादरले
अबंड शहरातील भालगाव रोड फकरबाद नाल्याजवळ काल ३ जानेवारी रोजी दुपारी १९ वर्षीय नारायण लिबांजी बाबर या तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. नारायण बाबर हा २ जानेवारी पासून बेपत्ता झाला होता. नारायण शिंदे नगर भागातील त्याच्या घरी असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास नारायणच्या मोबाईलवर एक कॉल आला होता. नारायणने तो कॉल उचलला आणि […]
आधी जुळता जुळत नव्हतं नंतर एकाच गावात लागोपाठ झाली 2 लग्न; दोन्ही घरात भयंकर घडलं
एकाच गावातील दोन तरुण ज्यांचं लग्नाचं वय झालं होतं पण त्यांना लग्नासाठी मुलगी काही मिळत नव्हती. अखेर दोघांनाही मुली भेटल्या. लागोपाठ त्यांच्या लग्नाचा बार उडाला. सर्व गावात आनंद होता. पण सुहागरातला मात्र या दोन्ही घरात भयंकर घडलं. मध्य प्रदेशमधील लग्नाचं हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सागर जिल्ह्यातील समनापूरमध्ये राहणारा 29 वर्षीय कमलेश तिवारी यांचे […]
माणुसकीला काळीमा, ८ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आई पळाली
छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णालयात एका महिलेनं बाळासाठी औषध आणायला जाते, असं सांगून आपलं बाळ दुसऱ्या महिलेकडे सोपवलं. बराच वेळ झाला, परंतु बाळाची आई परतली नाही. त्यामुळे त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा ती पसार झाल्याचं लक्षात आलं. या संदर्भात पोलीस ठाण्यात आणि महिला बालकल्याण विभागात तक्रार देण्यात […]
स्वत:च्या खोट्या मृत्यूसाठी मित्रालाच संपवलं, 1 कोटी रुपयांसाठी दोस्तच बनला हैवान
सध्याच्या काळात पैसा मिळवण्यासाठी कोण काय करील, याचा काही नेम राहिलेला नाही. चेन्नईमध्ये तर झटपट पैसा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःची विमा पॉलिसी काढली, व स्वतःसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा खून केला. त्यानंतर एक कोटीच्या विमा रकमेवर दावाही केला. तमिळनाडूत चेन्नईतून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तिथे एका व्यक्तीने एक कोटी रुपयांच्या विमा रकमेवर […]
मोबाइलचं व्यसन अन् मुलगा झाला ‘राक्षस’; आई-बापासह बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या!
तिहेरी हत्याकांडाने राजस्थानातीलनागौरमध्ये खळबळ उडाली आहे. पडुकलान इथं राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने रविवारी कुऱ्हाडीने वार करून आई, वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली. मोहित असं आरोपीचं नाव असून त्याला मोबाईल गेमचं व्यसन लागलं होतं, असं सागितलं जात आहे. मोहित दिवसातील तब्बल १५ ते १६ तास मोबाईलचा वापर करत असे. एखाद्या हिंसक ऑनलाइन गेमच्या […]
लोक Happy New Year म्हणत जल्लोष करत होते, पण त्या घरात 5 जणांसोबत घडलं भयानक
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सर्वत्र एकच जल्लोष सुरू होता. पण एका गावामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. एकाच कुटुंबीतील 5 जणांनी आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधर येथील डरौली खुर्द गावात ही घटना घडली आहे. मनमोहन सिंह असं मृतांचं नाव आहे. […]
अंगणवाडी सेविकेचा नवरा आणि दिरावर गोळाबार; देशी कट्टा घेऊन पोहचली ठाण्यात
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उज्जैनमधून हत्येची एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने पती आणि दिरावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळीबार केला. यात नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दिराचाही काही वेळाने मृत्यू झाला. या प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही महिला हातात पिस्तूल घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. अतिरिक्त एसपी नितीश भार्गव यांनी […]










