ताज्याघडामोडी

अनैतिक संबंधातून भावंडांनीच जन्मदात्या बापाला संपवलं; आरोपीत अल्पवयीन मुलीचा समावेश

गेल्या काही वर्षात अनैतिक संबंधातून होणारी गुन्हेगारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील लमगाडा भागात घडली आहे. अनैतिक संबंधांमुळे तीन मुलांनी एका मित्राच्या मदतीने जन्मदात्या वडिलांचा जीव घेतला. लमगाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश नाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) मधून निवृत्त झालेले 60 वर्षीय सुंदर लाल यांचा विळ्याने भोसकून आणि काठीने मारहाण करुन खून करण्यात आला.

पोलीस स्टेशनचे प्रमुख नाथ यांनी सांगितले की, सुंदर लाल सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गावी भागदेवली येथे आले होते, तर त्यांची मोठी मुलगी डिंपल (वय 25), मुलगा ऋतिक (वय 21) आणि धाकटी अल्पवयीन मुलगी डेहराडूनमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहत होते. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी सुंदर लालचा मुलगा, दोन मुली आणि मोठ्या मुलीचा मित्र हर्षवर्धन (संगम विहार, दिल्ली) गावात पोहोचले. त्यांनी मृताच्या भावाला (सुंदर लाल) कुटुंबासह मारहाण केली आणि घरापासून दूर हाकलून दिले.

पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळातच घरातून आरडाओरड्याचा आवाज येऊ लागला, त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून तेथून पळणाऱ्या चार आरोपींना पकडले. त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडला असता आत सुंदरलाल यांचा मृतदेह पडलेला आढळून आला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही घटनास्थळावरून अटक केली, तर अल्पवयीन मुलीला बाल संरक्षण केंद्रात पाठवले. मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी अल्मोडा येथे पाठवण्यात आला. सुंदरलालच्या भावाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनात वापरलेली हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, डिंपलचे प्रेमसंबंध तिच्या वडिलांना मंजूर नव्हते आणि याचा राग आल्याने डिंपलने तिच्या भावंडांसह तिच्या वडिलांचा खून केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दुसरीकडे, आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले आहे की, त्यांच्या वडिलांचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते, त्यामुळे तणावामुळे 2018 मध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यांनी सांगितले की, सुंदर लाल त्यांना पैसेही पाठवत नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *