ताज्याघडामोडी

लोक Happy New Year म्हणत जल्लोष करत होते, पण त्या घरात 5 जणांसोबत घडलं भयानक

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सर्वत्र एकच जल्लोष सुरू होता. पण एका गावामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. एकाच कुटुंबीतील 5 जणांनी आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधर येथील डरौली खुर्द गावात ही घटना घडली आहे. मनमोहन सिंह असं मृतांचं नाव आहे. मनमोहन सिंह हे पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होते. त्यांनी आपल्यासह कुटुंबातील 5 जणांसह आत्महत्या केली.

मनमोहन सिंह (55), त्याची पत्नी सरबजीत कौर(55), प्रभजोत उर्फ ज्योती (32), गुरप्रीत कौर उर्फ गोपी (31) आणि ज्योतीची मुलगी अमन (वय 3)अशा 5 जणांनी आत्महत्या केली. मनमोहन सिंह आणि सरबजीत कौर या दोघांनी घरात लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिघांचे मृतदेह हे बेडवर आढळले.

मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांच्यावर कर्ज होतं. कर्ज फेडलं जात नसल्यामुळे ते तणावात होते. याच तणावामधून मनमोहन सिंह याने कुटुंबासह आत्महत्येचा निर्णय घेतला. आपल्या मृत्यूबद्दल मनमोहन सिंह यांनी एक सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. यात त्यांनी कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलाहमुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. परंतु, या कुटुंबाने आत्महत्या का केली याचे कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच समोर येईल, अशी माहिती एसएसपी मुखविंदर सिंह यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *