मुंबई सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आशिष बिपीनभाई आहिर या 32 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली आहे. मुळचा गुजरातमधील सुरतचा रहिवासी असलेल्या आशिषनं लंडनच्या प्रतिष्ठित संस्थेमधून शिक्षण घेतले होते. कोरोना व्हायरसच्या काळात त्यानं लंडनमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर स्वत:ची कर्ज फेडण्यासाठी त्यानं बोगस वेबसाईट बनवली आणि लोकांची फसवणूक सुरु केली. आशिषनं ‘शॉपी डॉट कॉम’ ही वेबसाईट […]
ताज्याघडामोडी
पोलिसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार करू -गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पोलिसांच्या गणवेशात बदल झाल्यानंतर गणवेशात […]
आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची नव्याने भरती – ना.राजेश टोपे
कोरोना काळात राज्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रेणेवरील ताण कमी करण्यासाठी आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. कळंब येथील एका खासगी रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी राजेश टोपे बोलत होते. डॉक्टर, नर्सेस, टेकनेशीयन, वॉर्ड बॉय, अशा […]
बर्ड फ्लूमुळे व्यक्ती दगावल्याचे सिद्ध केल्यास पारितोषिक देतो !
बर्ड फ्लूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होत नाही. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्यांना पारितोषिक दिले जाईल, असे आवाहन पशुसंर्वधन, दुग्धविकास व मत्सविकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. शेतकरी भवन येथे विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ पोल्ट्री फार्मर्स […]
औरंगाबाद म्हणानाहीतर संभाजीनगर म्हणा मी गांभीर्याने घेत नाही !
औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत एकमत नसताना, विशेषत: शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका वेगवेगळी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या विषयावर वेगळेच भाष्य केले आहे. आमच्यात वाद नसून संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा, या प्रकरणाकडे मी गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या विषयावर मी कधीही भाष्य केलेले नाही, असे शरद पवार यांनी […]
”त्या”ऍक्टिव्हा चालकाच्या शोधात पंढरपूर शहर पोलीस
पंढरपूर शहरातील अतिशय वर्दळीचा व सातत्याने अपघात प्रवण म्हणून ओळखला जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज रोडवर अहिल्या धाब्यानजीक शिरढोण तालुका पंढरपूर येथील ग्रामस्थ महादेव शिवाजी भुसनर यांच्या दुचाकीस एका पांढऱ्या रंगाच्या अँक्टिव्हा मोटारसायकल स्वाराने राँग साईडने भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने या अपघातात सदर महादेव शिवाजी भुसनर हे गंभीर जखमी झाले होते.या अपघातानंतर सदर ऍक्टिव्हा […]
वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळणार बॉडीवार्न कॅमेरे
वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.पोलीस जिमखाना येथे वाहतूक शाखेतील पोलिसांना या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त […]
पुण्याकडून सोलापूरला जाणारी वाहतूक बंद
17 जानेवारी : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ एमआयडीसी जवळ केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. टँकर महामार्गावरून बाजूला करताना आग लागण्याची शक्यता असून पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहा क्रेन आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असण्याची शक्यता असल्याने पलटी झालेल्या टँकरला बाजूला करण्यासाठी खबरदारी म्हणून क्रेन […]
आठ टेबलवर नऊ फेऱ्यात होणार मतमोजणी
पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले असून.मतमोजणी सोमवार दि 18 जानेवारी 2021 रोजी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सकाळी 8.00 वाजता होणार आहे. मतमोजणी 219 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 टेबलवर 9 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. याबाबत प्रशासनाने पुर्ण तयारी केली असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार […]
राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळले लसीकरण स्थगितीचे वृत्त
शनिवारपासून देशासह राज्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पण राज्यात दोन दिवसांसाठी लसीकरण अभियान स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण लस नोंदणीसाठीचे ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळून लावले आहे. कोरोनावरील दोन प्रतिबंधात्मक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर शनिवारपासून […]