रशियन कोरोना लस वापरण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने रशियाची स्पुटनिक-व्ही लस आयात केली आहे. लसीचे दीड लाख डोस हिंदुस्थानात पोहोचले आहेत. मात्र अजूनही लस बाजारात यायला आठ ते दहा दिवस लागतील. तिच्या एका डोसची हिंदुस्थानातील किंमत 300 ते 600 रुपयांदरम्यान असू शकते. स्पुटनिक-व्हीचे नमुने तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात […]
ताज्याघडामोडी
कोरोना रूग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढून लोकांनी केला ‘दफन’
राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या एका गावात एका कोविड पीडित व्यक्तीचा मृतदेह कथित प्रकारे दफन केल्यानंतर सुमारे 21 लोकांनी आपला जीव गमावला, या व्यक्तीचा मृतदेह कोणत्याही कोविड प्रोटोकॉलचे पालन न करता गुजरातहून आणला गेला होता. राजस्थान काँग्रेस प्रमुख आणि राज्याचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांच्या विधानसभा मतदार संघातील सीकरच्या खीरवा गावात ही घटना घडली आहे. अधिकार्यांनी […]
कोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा
सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले आहेत की, 11 किंवा 12 मेपासून ही […]
सर्वच व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी
जीवनावश्यक वस्तुंची सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांप्रमाणे इतर सर्व व्यावसायिकांनादेखील घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात यावी. याबरोबरच व्यापाऱ्यांचा संपर्क थेट ग्राहकांबरोबर होत असल्याने त्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी ही […]
रिक्षा चालकांच्या खात्यावर १५०० रुपये वर्ग करण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध
कोविड काळातील मदत म्हणून राज्य सरकारने राज्यातील रिक्षा चालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 108 कोटी रुपयांच्या खर्चाला अनुमती दिली आहे.राज्यातील सुमारे 7 लाख 20 हजार रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ होणार आहे. लॉकडाऊन मुळे रिक्षा व्यवसाय बंद झाल्याने या रिक्षा चालकांना तातडीची आर्थिक मदत […]
मोदींनी तीन महिन्यात साडेसहा कोटी लसी परदेशात पाठवल्या
गेल्या ३ महिन्यांमध्ये केंद्र सरकारने जगातील ९३ देशांना साडेसहा कोटी लसींचा पुरवठा केला. पहिली लाट ओसरल्यानंतर हा भारतातील करोना महासाथीचा शेवट असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे भाकीत फोल ठरले आहे तर देशातील माध्यमांची,न्यायालयाची दखल मोदींनी घेतली नाही निदान परदेशातील माध्यमातून होणारी टीका तरी लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात असे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले आहे. […]
कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण
इंदापूर, 09 मे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका कोविड सेंटरमध्ये घुसून काही तरुणांनी तुफान राडा केला आहे. आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत, असा आरोप करत दोन तरुणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पोलिसाचा कोरोनाने मृत्यू
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राधान्याने दिली गेली.मात्र, मुंबईत कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका पोलिस कर्मचा-याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संदीप तावडे असे कोरोनाने मृत्यू झालेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहेसंदीप तावडे यांनी 12 फेब्रुवारीला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर महिन्यांनी 13 […]
पुढे 8 दिवस बँका बंद राहणार, कोरोना काळात घरातून बाहेर पडण्याआधी पाहा सुट्ट्यांची लिस्ट…
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर हाहाकार माजला आहे. दररोज 4 लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थिती सध्या अनेक बँकांकडून आपल्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे इंटरनेटच्या माध्यामातून करण्यास सांगितले जात आहे. बँकांकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट बँकिंग आणि इतर ऑनलाइन सुविधांमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान, असे असले तरी तुम्हाला बँकसंबंधी […]
योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल
मुंबई: करोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र सरकार करत असलेल्या चांगल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. ही संधी साधत राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला हाणला आहे. महामारीला सुरुवात झाल्यापासून फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते […]











