ताज्याघडामोडी

आता चोरीला जाणार नाही तुमची बाईक, वापरा हे स्वस्त डिव्हाईस

BS6 आल्यानंतर बाईकच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आता मोटारसायकलींच्या किमती पूर्वीपेक्षा खूप वाढल्या आहेत. याशिवाय हप्ते किंवा ईएमआयवरील त्यांच्या किमती आणखी वाढत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांसाठी मोटारसायकल खरेदी करणे हा एक महागडा सौदा झाला आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दुचाकीची विशेष काळजी घेतली […]

ताज्याघडामोडी

महागडे मोबाईल विकत होत्या थोडक्या किमतीत 

सोशल मीडियावरून झाला टोळीचा पर्दाफाश  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महागडे अँड्रॉइड मोबाईल स्वस्तात विकण्याचे निवेदन देऊन, ग्राहकांना आमिष दाखवणाऱ्या  गुन्हेगारांना मुंबईतील गुन्हे शाखा युनिट 11 ने अटक केली आहे. जेव्हा एखादा ग्राहक मोबाईल मिळविण्यासाठी या मेमोरँडम लिंकवरील फॉर्ममध्ये आपला तपशील भरतो, त्याच वेळी त्याला मुंबईत सुरू असलेल्या कॉल सेंटरमधून फोन यायचा की, हा मोबाईल कॅश ऑन डिलिव्हरी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची “एमडाॅक्स” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड

“एमडाॅक्स” हि एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी संप्रेषण, माध्यम आणि वित्तीय सेवा प्रदाता आणि डिजिटल उपक्रमांसाठी साॅफ्टवेअर सेवांमध्ये तज्ञ आहे. अशा कंपनीत पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील सुमेरा शेख व सुशांत बारजे हे दोन विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये पास होणार आहेत तत्पूर्वीच सिंहगड कॉलेजच्या कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन शिक्षण […]

ताज्याघडामोडी

नात्याला काळिमा फासणारी घटना; सख्ख्या भावानेच केले बहिणीचे लैंगिक शोषण

वर्ध्याच्या सर्वसामान्य कुटुंबातील आई वडील मंजुरीसाठी बाहेर जात असतांना 17 वर्षीय मुलाने स्वतःच्याच अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या विकृत मानसिकतेच्या भावाने भीती दिल्याने मुलीने याची वाच्यया केली नाही. परिणामी दुर्लक्ष केल्याने आता तिच्या पोटात दुखत असल्याने ती गर्भवती असल्याचे वैदकीय तपासणीत सेवाग्राम रुग्णलयात समोर आले. यात पीडिता सुरूवातीला काहिही सांगण्यास […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांनी शिवसेना संपवली ?

उद्धव ठाकरेंनी दिले उत्तर  शिवसेना शरद पवारांनी संपवली का? या आरोपावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी […]

ताज्याघडामोडी

ऑगस्टमध्ये १३ दिवस बंद राहणार बँका, पहा संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्यात तुम्हाला बँकेशी संबंधित काही कामं करायची असतील तर आताच करा.ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत, ज्या दिवशी बँकांना सुटी असणार आहे. याशिवाय रविवारी दुसरा आणि चौथा शनिवार साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. या साप्ताहिक सुट्या एकत्र घेऊन ऑगस्टमध्ये संपूर्ण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक: रिक्षातून न्यायला नकार; युवकावर चॉपरने वार; घटना CCTV मध्ये कैद

दोन महिन्यांपूर्वी एका रिक्षातून बदलापूरला न्यायला नकार दिल्याचा राग मनात धरून एका रिक्षाचालकाच्या डोक्यात चॉपरने वार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या गायकवाड पाडा भागात कल्पेश पाटील हा तरुण राहतो. याच परिसरात राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोन गावगुंड राहतात. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्पेश हा त्याच्या मित्रांसोबत रात्री जेवण करून परिसरात फिरत […]

ताज्याघडामोडी

पुण्यात गुंडांच्या आणखी एका टोळी विरोधात मोक्का कारवाई

वारजे, एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का)  कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय २१), सचिन शंकर दळवी (वय २३), सुरज राजू मारूडा (वय २१), रखमाजी परमेश्वर […]

ताज्याघडामोडी

पोहताना दम लागल्याने तलाठ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

मुकुंद त्रिंबकराव चिरके सहा महिन्यापूर्वी वेल्हा तलाठी म्हणून येथे कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली भोर येथे झाली होती. सोमवारी सकाळी सात वाजता चिरके हे चार मित्रांसोबत वरवे येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहताना त्यांना दम लागून ते पाण्यात बुडले . चिरके पोहण्यात सराईत होते. मात्र पोहताना त्यांना दम लागल्याने ते तलावात बुडले. बुडताना मदतीसाठी त्यांनी […]

ताज्याघडामोडी

तृतीयपंथी म्हणून बाळाला आशिर्वाद देण्यासाठी आले अन् मंत्रोच्चार करत आईच्या गळ्यातील मंगळसूत्र नेले

तृतीयपंथी असल्याचे भासवत मंत्रोच्चार करत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आलं आहे. सदर टोळी आपण तृतीयपंथी असल्याचे भासवत नागरिकांची फसवणूक करत होती. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अलका प्रजापती यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची भाची प्रसूतीसाठी गुजरातहून मुंबईत आली होती. काही तृतीयपंथी त्यांच्या घरी आले, घरात नवजात बालक […]