ताज्याघडामोडी

शरद पवारांनी शिवसेना संपवली ?

उद्धव ठाकरेंनी दिले उत्तर 

शिवसेना शरद पवारांनी संपवली का? या आरोपावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमपं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधत आहात.

मला सातत्याने असे भासवलं जात होते की, काँग्रेस दगा देणार आणि पवारसाहेबांवर तर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. तेच तुम्हाला पाडतील असेच सगळे म्हणायचे. अजित पवारांबद्दलही माझ्याकडे येऊन बोलायचे. मात्र मला माझ्याच माणसांनी दगा दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीला जाऊन सांगितलं असतं की माझी लोकं तुमच्यासोबत काही आनंदाने राहायला तयार नाहीत. पण त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती. कारणच नाहीत ना काही. रोज नवी कारणं पुढे येताहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीवर याचं खापर फोडलं. तर अनेकांनी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली असा आरोप केलं. या सर्व आरोपांवर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीचा दुसरा भाग आज आज प्रसिद्ध झाला आहे. त्यात अनेक खुलासे त्यांनी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *