ताज्याघडामोडी

तृतीयपंथी म्हणून बाळाला आशिर्वाद देण्यासाठी आले अन् मंत्रोच्चार करत आईच्या गळ्यातील मंगळसूत्र नेले

तृतीयपंथी असल्याचे भासवत मंत्रोच्चार करत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आलं आहे. सदर टोळी आपण तृतीयपंथी असल्याचे भासवत नागरिकांची फसवणूक करत होती.

MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अलका प्रजापती यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची भाची प्रसूतीसाठी गुजरातहून मुंबईत आली होती. काही तृतीयपंथी त्यांच्या घरी आले, घरात नवजात बालक असल्याचे सांगत आशिर्वादासाठी त्यांनी त्या कुटुंबाकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. यावर आपण ५०० रुपयांपेक्षा जास्त देऊ शकणार नाही असं सदर घरातील मंडळींनी सांगितलं.

दरम्यान, या आरोपींनी घरातील व्यक्तींना एक साधा पांढरा कागद, तांदूळ आणि हळदी-कुंकू मागितलं आणि काही मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. शिवाय मंत्रोच्चार करत असताना एका आरोपीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे पेंडेंट मागितले. नंतर मंगळसुत्र आणि तो सोन्याचा ऐवज आणि तांदूळ एका पांढऱ्या कागदात गुंडाळून त्यांच्याजवळ दिले व पुडी सात दिवस घरातील देव्हाऱ्यात ठेवण्यास सांगितली.

शिवाय पुडी उघडू नका नाहीतर मुल आजारी पडेल असही त्यांनी यावेळी फिर्यादीला सांगितलं. दरम्यान, या आरोपींना सांगितल्याप्रमाणे ७ दिवसांनी महिलेने पुडी उघडली तेव्हा तेथे फक्त तांदूळ होते आणि ५१ हजार रुपयांचे मौल्यवान पेंडंट गायब होते. ही बाब लक्षात येताच महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून त्या परिसरातून सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *