ताज्याघडामोडी

पुण्यात गुंडांच्या आणखी एका टोळी विरोधात मोक्का कारवाई

वारजे, एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का)  कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय २१), सचिन शंकर दळवी (वय २३), सुरज राजू मारूडा (वय २१), रखमाजी परमेश्वर जाधव (वय १९), प्रतीक संजय नलावडे (वय २१), समीर नरहरी कांबळे (वय १८) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. वाघमारे आणि साथीदारांनी वारजे, उत्तमनगर भागात दहशत माजविली होती. या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न व लूट करणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर वाघमारे आणि साथीदारांच्या वर्तणुकीत बदल झालेला नव्हता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी, वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *