आई आणि मुलगी दुचाकीने घरी जात असताना भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. त्यात पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात काल जागतिक महिला दिनाच्या रात्री म्हणजेच बुधवारी दहा वाजताच्या सुमारास घडली. संपदा तुपवणे […]
ताज्याघडामोडी
त्या महिलेचा नाद सोड, नाहीतर…; तरुणाला धमकी दिली अन् नंतर त्याचा मृतदेहच सापडला
आष्टा या ठिकाणी एका तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी आप्पा कुलाळ, वय वर्ष ३५,असे या तरुणाचं नाव असून अनैतिक संबंधतून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. आष्टा शहरातल्या नागावर रस्त्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून […]
बायकोने पोलिसांत तक्रार दिल्याचा राग अनावर, घरी येताच पतीनेच दिली भयंकर शिक्षा
पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन परतताच पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी दुपारी कळमना स्टेशनअंतर्गत मिनीमातानगर येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. अमर भारद्वाज (वय ५०), असे अटकेतील पतीचे तर ललिता भारद्वाज (वय ४०), असे मृतकाचे नाव आहे. अमर याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय […]
भाजप कार्यकर्त्यावरील हल्ला: राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नीवरही गुन्हा दाखल
माजलगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर काल प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात शेजुळ हे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर माजलगाव येथील प्राथमिक उपचार रुग्णालयात करून नंतर औरंगाबाद येथे हलवण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूतगिरणीत होत असलेल्या गैरप्रकाराविषयी तक्रार केली असल्यानेच माझ्यावर हल्ला झाला आहे, असा आरोप करत शेजुळ यांनी पोलीस […]
8 मुलांची आई, अनैतिक संबंध.. नंतर एका वयस्काचा खून, नंतर आरोपीला जे कळलं त्याने तोच हादरला
अनैतिक संबंधातून अनेकदा एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते. सागर पोलिसांनी अशाच एका खुनाचा उलगडा केला आहे. जसजसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला तशा धक्कादायक बाबी समोर आल्या.सागर येथील एका गावात आठ मुलांच्या आईने आपल्या मोठ्या मुलासोबत एका व्यक्तीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी महिला आणि तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्या तरुणाने ज्याची हत्या केली […]
कांद्याला भाव नाही, घरात खाणारी तोंड नऊ, २५ वर्षांच्या शेतकऱ्याने नको ते पाऊल उचललं
शेतात पिकवलेला कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, त्यामुळे हातात पैसा देखील आला नाही, घरात नऊ जणांची खांद्यावर जबाबदारी, यातच लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचं कसं याची विवंचना, या कारणावरुनच बीडमधील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.संभाजी अर्जुन अष्टेकर असे टोकाचे पाऊल उचललेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज आपल्या शेतात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची […]
सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणं भोवलं, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा
प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून […]
तलावात सापडली 2.57 कोटींच्या किमतीची सोन्याची 40 बिस्कीटं! समोर आली धक्कादायक माहिती..
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कल्याणी सीमा चौकी परिसरात एका तलावातून सुमारे 2.57 कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे बीएसएफने जप्त केली आहेत. विशिष्ट माहितीच्या आधारे सोन्याचा शोध घेण्यासाठी बीएसएफच्या पथकाने सोमवारी एका तलावात शोध मोहीम हाती घेतली, त्यावेळी त्यांच्या हाती हे घबाड हाती लागले. तळ्यात 40 सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 2.57 […]
प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दोन सख्ख्या भावांना अटक
प्रेयसी बाबत वडिलांनी अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला.मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोन भावांना अटक केली आहे. हा प्रकार दिघी येथे रविवारी (दि.5) रात्री नऊच्या सुमारास घडला आहे. अशोक रामदास जाधव (वय-45 रा. दिघी) असे खून झालेल्या […]
पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीत फसवणूक; 10 उमेदवारांविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा
पोलीस भरतीदरम्यान मरोळ येथील मैदानावर शारीरिक मैदानी चाचणीत सहभागी काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी गैरमार्ग पोलीस भरती प्रक्रियेत काही उमेदवार वापर करत असल्याचे आढळले आहे. हा गैरव्यवहार ट्रिगर अलर्टच्या पद्धतीमुळे उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व उमेदवारांना पीईटी भरती दरम्यान त्यांची निष्पक्ष आणि प्रामाणिक […]











