ताज्याघडामोडी

रुग्णवाहिका मिळाली नाही; बापानं बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीतून नेला

मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाला लाज आणणारा प्रकार सिंगरौलीत घडला. मृत अर्भकाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. सिंगरौलीतील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही घटना घडली. दिनेश भारती त्यांची गर्भवती पत्नी मीना यांना घेऊन १७ ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालयात […]

ताज्याघडामोडी

कॉलेजच्या गेटवरच तरुणांमध्ये तुफान हाणामारी; एक विद्यार्थी गंभीर जखमी

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका कॉलेजच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. किरकोळ कारणावरून ही हाणामारी सुरू झाली होती. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसन नंतर थेट जबर हाणामारीत झालं. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. जखमी झालेल्या तरुणावर सध्या नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना साधारण […]

ताज्याघडामोडी

भाजपला धक्का देत माजी आमदाराचा मुलगा थेट ‘मातोश्री’वर; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन

भाजपचे ज्येष्ठ नेते धुळ्याचे माजी आमदार तथा धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांचे पुत्र ॲड. यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे. कदमबांडे यांनी बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’ येथे माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. राजवर्धन कदमबांडे हे कायमच धुळ्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रा.लि.’ कंपनीत निवड

विक्रमी प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल पंढरपूरः ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून स्वेरीकडून यंदा विद्यार्थ्यांना ६०० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’ अशी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची इंनटरशिप निवड

पंढरपूर: प्रतिनिधी   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील ५ विद्यार्थ्यांची “एलेशन” कंपनीत इंनटरशिप निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.  अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता, जास्त पॅकेज देणाऱ्या कंपनीमध्ये अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात विद्यार्थी फिरत असतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना निराशा पदरी पडते. नामांकित कंपनीदेखील गुणवत्तपूर्ण विद्यार्थ्यांनाच […]

ताज्याघडामोडी

भास्कर जाधव यांच्या घरावर आज्ञात इसमानांनी केली दगडफेक

सत्तांतर नंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका करत आहेत. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून त्यांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. अशातच भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सहाय्यक फौजदाराने केला युवतीचा विनयभंग

सातारा येथे पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदाराने स्पर्धा संपल्यानंतर कोल्हापूरला परत जाताना चालत्या बसमध्ये एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली. फिर्याद शुन्य क्रमांकाने सोमवारी रात्रीउशीरा कराड शहर पोलिस ठाण्याकडून बोरगाव पोलिस ठाण्यात वर्ग झाली आहे. महेश मारुती मगदूम असे त्या सहाय्यक फौजदाराचे नाव असुन तो कोल्हापूर पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. […]

ताज्याघडामोडी

आरबीआयची दोन मोठ्या सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई, महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचाही समावेश

बँक अशी ओळख असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन बड्या सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे येथील राजगुरूनगर सहकारी बँकेचाही समावेश आहे. अन्य एक बँक गुजरातमधील आहे. को-ऑपरेटीव्ह ऑफ राजकोट असे या बँकेचे नाव आहे. आरबीआयने राजगुरूनगर सहकारी बँकेला चार लाख आणि को-ऑपरेटीव्ह ऑफ राजकोटला दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडात्मक कारवाईबाबत आरबीआयने […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ फोटो बद्दल आ.रोहित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी

सोशल मीडियावरून होऊ लागली होती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सृजन संस्थेकडून ‘गड किल्ले बांधणी महास्पर्धा-२०२२’ चे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेलं पोस्टर आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या स्पर्धेचं पोस्टर डिझाइन करत असताना शरद पवारांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरच्या बाजुला लावण्यात आला आहे. यावर काहीजणांनी आक्षेप […]

ताज्याघडामोडी

पत्नी नांदायला येईना; नवऱ्यानं सासरचं घर पेटवलं; पत्नी, मुलांसह पाच जणांचा होरपळून मृत्यू

पंजाबमधील जालंधरमध्ये एका व्यक्तीने सासरी जाऊन पत्नी, मुलगा, मुलगी, सासरे आणि सासूला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेहतपूर शहरात ही घटना घडली आहे. कुलदीप सिंग नावाच्या व्यक्तीने सासरी जाऊन पत्नी परमजीत कौर, मुलगा गुरमोहल, मुलगी अर्शदीप कौर, सासू जंगीद्रो बाई आणि सासरे सुरजन सिंग यांना पेट्रोल टाकून जाळले आणि दरवाजा बाहेरुन बंद केला. एसपी […]