ताज्याघडामोडी

आरबीआयची दोन मोठ्या सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई, महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचाही समावेश

बँक अशी ओळख असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन बड्या सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे येथील राजगुरूनगर सहकारी बँकेचाही समावेश आहे.

अन्य एक बँक गुजरातमधील आहे. को-ऑपरेटीव्ह ऑफ राजकोट असे या बँकेचे नाव आहे. आरबीआयने राजगुरूनगर सहकारी बँकेला चार लाख आणि को-ऑपरेटीव्ह ऑफ राजकोटला दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

दंडात्मक कारवाईबाबत आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, व्याजदर आणि ठेवींबाबत केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजगुरू सहकारी बँक दोषी आढळली आहे. तर को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटने जागरुकता योजनेसंबंधी नियमांची अवहेलना केल्याचे निदर्शनास आले आहे.

आरबीआयने या दोन्ही बँकांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल समोर आल्यावर राजगुरूनगर सहकारी बँकेने मृत खातेधारकांच्या चालू खात्यामध्ये असलेली रक्कम त्यांच्या वारसांना सोपवली नसल्याचे उघड झाले. अशा परिस्थितीत खातेधारांच्या वारसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

आरबीआयने राजगुरूनगर सहकारी बँकेला याआधी नोटीस पाठवली होती. याला बँकेने लेखी जबाबाद्वारे उत्तर दिले होते. मात्र लेखी जबाबाने आरबीआयचे समाधान झाले नाही, त्यामुळे आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल बँकेला दंड ठोठावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *