गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सहाय्यक फौजदाराने केला युवतीचा विनयभंग

सातारा येथे पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदाराने स्पर्धा संपल्यानंतर कोल्हापूरला परत जाताना चालत्या बसमध्ये एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली.

फिर्याद शुन्य क्रमांकाने सोमवारी रात्रीउशीरा कराड शहर पोलिस ठाण्याकडून बोरगाव पोलिस ठाण्यात वर्ग झाली आहे. महेश मारुती मगदूम असे त्या सहाय्यक फौजदाराचे नाव असुन तो कोल्हापूर पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे.

महामार्गावर वळसे ते काशीळ दरम्यान ही घटना घडली. पीडित युवतीने याबाबत कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

याबाबत बोरगांव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन युवती ही सातारा शहरातील असून ती शिक्षणासाठी कराड येथे राहायला आहे. सोमवारी पीडित युवतीची परीक्षा असल्याने सकाळी साडे आठ वाजता बारामती-कोल्हापूर बसने कराडकडे जायला निघाली होती. काही वेळात एक अनोळखी इसम तिच्या शेजारी येऊन बसला.

त्यानंतर संबंधिताने या युवतीस नाव, गाव विचारत बोलण्यास सुरवात केली. त्याने आपण कोल्हापूरला पोलिस असल्याचे सांगून “आपण फ्रेंड्स बनू, चॅटिंग करू” असे बोलून मोबाईल नंबर मागितला. पीडितेने नंबर देण्यास नकार देत कानात हेडफोन घालून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळात त्याने तिच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे चाळे सुरू केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *