ताज्याघडामोडी

पत्नी नांदायला येईना; नवऱ्यानं सासरचं घर पेटवलं; पत्नी, मुलांसह पाच जणांचा होरपळून मृत्यू

पंजाबमधील जालंधरमध्ये एका व्यक्तीने सासरी जाऊन पत्नी, मुलगा, मुलगी, सासरे आणि सासूला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेहतपूर शहरात ही घटना घडली आहे. कुलदीप सिंग नावाच्या व्यक्तीने सासरी जाऊन पत्नी परमजीत कौर, मुलगा गुरमोहल, मुलगी अर्शदीप कौर, सासू जंगीद्रो बाई आणि सासरे सुरजन सिंग यांना पेट्रोल टाकून जाळले आणि दरवाजा बाहेरुन बंद केला.

एसपी सरबजीत सिंग बहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदीप सिंगने त्यांच्या साथीदारांसह तेलाच्या टाकीला आग लावली आणि बाहेरुन कुंडी लावून पळ काढला. आम्हाला अनेक पुरावे मिळाले आहेत. कुलदीप आणि परमजीतचे दुसरे लग्न झाले होते आणि परमजीतला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं. पण, कुलदीपला तिला घेऊन जायचं होतं.

सुरजन सिंह हा अतिशय गरीब कुटुंबातील होता आणि तो रोजंदारी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सुरजन सिंहने ८ वर्षांपूर्वी आपल्या मुलीचे लग्न परमजीत कौरशी केले. पण, काही काळापूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर परमजीत कौर आपल्या दोन मुलांसह गुलमोहर आणि अर्शदीपसह आपल्या माहेरी आल्या.

सुरजन सिंग यांनी कठोर परिश्रम करुन आपली मुलगी आणि तिच्या दोन मुलांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. सुमारे वर्षभरापूर्वी त्याने आपल्या मुलीचे लग्न खुरासैदपूर गावातील कुलदीप सिंग उर्फ कल्लू नावाच्या व्यक्तीशी लावले. काही वेळाने कल्लूने पत्नी आणि मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कुलदीप सिंग उर्फ कल्लू मुलांना दत्तक घेत नव्हता.

कुलदीप सिंग उर्फ कल्लू हा आपल्या पत्नीवर मुलांना सोबत न ठेवण्यासाठी दबाव आणत होता. मात्र, आई मुलांना सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरु झाले. त्यामुळे परमजीत आपल्या दोन मुलांना घेऊन आई-वडिलांच्या घरी आले होते. सोमवारी (१७ ऑक्टोबर) रात्री कुलदीप दारु पिऊन सासरी आला. तेव्हा संपूर्ण कुटुंब झोपले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *