पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील ५ विद्यार्थ्यांची “एलेशन” कंपनीत इंनटरशिप निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता, जास्त पॅकेज देणाऱ्या कंपनीमध्ये अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात विद्यार्थी फिरत असतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना निराशा पदरी पडते. नामांकित कंपनीदेखील गुणवत्तपूर्ण विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाते. अशावेळी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहूनच शिक्षण दिले जात आहे. अनेक कंपन्या पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला भेट देत आहेत. सिंहगडचे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कंपनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिक लाभदायी ठरत आहे. त्यामुळे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी विविध नामवंत व नामांकित कंपन्यांमध्ये निवडले जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कंपनीत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा ठसा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व सिद्ध केले आहे. अशा या नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अजिक्य कोळवले, शिवप्रसाद जगताप, समाधान माळी, जतिन कटप, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील कोमल शिंदे आदी ५ विद्यार्थ्यांची इंनटरशिप निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखुन अभियांत्रिकीचे शिक्षण देत पालकांची विश्वासार्हता जोपासून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवत नावलौकिक संपादित करत यशस्वी वाटचाल केली आहे. पालक व विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज वर दाखवलेली विश्वासार्हता हेच महाविद्यालयाचे यश आहे.
“एलेशन” कंपनीत इंनटरशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.