शेतकरी आणि बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढे चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस राज्यात पाऊस असणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं […]
ताज्याघडामोडी
रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता; अजितदादा भडकले
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षकांमधून काही जण विविध मागण्या व सूचना करत होते. शेवटी अजित पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांचा समाचार घेतला. ‘तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत मी […]
लक्ष्मी सहकारी बँकेवर आरबीआयची कारवाई; निर्बंधानंतर संचालक मंडळ बरखास्त
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान आरबीआयकडून निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहकार खात्याने दी. लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचा आदेश कढला आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता बँकेवर दोन सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी बँक आर्थिक संकटात […]
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. त्यांच्या मागण्यांसाठी परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळ आणि एसटी कर्मचारी संघटनांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बार्शी मतदारसंघातील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनीही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यावेळी बोलताना राऊत यांनी दिव्यांगांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात […]
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
शासनामध्ये विलीन करण्यासाठी गेले काही दिवस संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच विलिनीकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन परब यांनी […]
रेल्वे कर्मचाऱ्याने आईची हत्या करून घरातचं जाळलं; त्यानंतर उचललं धक्कादायक पाऊल
हरयाणाताली जिंदमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने शनिवारी वयस्कर आईची हत्या केल्यानंतर घर जाळल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. यानंतर व्यक्तीने स्वत: रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्याने धारदार शस्त्राने आपल्या आईवर वार केले आणि त्यानंतर घराला आग लावून फरार झाला. रेल्वे चौकीचे प्रभारी चरण सिंग यांनी सांगितलं […]
हरवलेल्या पत्नीची तक्रार करणाऱ्य़ा पतीने पोलीस स्थानकात स्वतःला पेटवले
मुंबईतील एका 32 वर्षीय व्यक्तीने पोलीस स्थानकाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतले आहे. ही व्यक्ती 65 टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सर्वजीत मोरे असे या व्यक्तीचे नाव आहे. सर्वजित मोरे याचा भाऊ पोलीस खात्यात कार्यरत आहे. सर्वजित आधी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. नंतर त्याची नोकरी गेली आणि तो बेरोजगार झाला. सर्वजितने 17 ऑक्टोबर […]
रेल्वे तिकीटदर ३० टक्क्यांनी कमी करण्याची रेल्वे मंत्रालयाची घोषणा
रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वे संदर्भात मोठा निर्णय घेत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे. आता कोरोना पूर्वीप्रमाणेच सर्व रेल्वे गाड्या धावतील. म्हणजेच आता गाड्या जुन्या क्रमांकावरून आणि जुन्या तिकीटदरावर धावतील. आता मंत्रालयाने विशेष क्रमांकावरून धावणाऱ्या ट्रेनला नियमित रेल्वे क्रमांकावर धावण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना या आदेशानंतर रेल्वे भाड्यात दिलासा मिळणार आहे. […]
ज्या गावात बालविवाह त्या गावच्या सरपंच,तलाठी,ग्रामसेवकाचे पद धोक्यात येणार ?
राज्यात कोरोनाकाळात बालविवाहाचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय झाले आहे. यासाठी राज्य महिला आयोगानं एका नवीन नियम लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडं पत्र लिहून केली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे. बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता सदरचे या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह […]
हिंदुत्व म्हणजे मुस्लीम व शिखांना मारहाण करणे – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हिंदुत्व आणि हिंदूत्ववाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे म्हणत या फरकांचा शोध घेण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे, असं म्हटलं आहे. सेवाग्राम इथे काँग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराला आज सुरुवात झाली. देशभरातील ३० राज्यातील काँग्रेसचे २०० निवडक पदाधिकारी या शिबीरात सहभागी झाले आहेत. चार दिवस विविध वक्ते या शिबिरात […]











