गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हरवलेल्या पत्नीची तक्रार करणाऱ्य़ा पतीने पोलीस स्थानकात स्वतःला पेटवले

मुंबईतील एका 32 वर्षीय व्यक्तीने पोलीस स्थानकाच्या बाहेर स्वतःला पेटवून घेतले आहे. ही व्यक्ती 65 टक्के भाजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सर्वजीत मोरे असे या व्यक्तीचे नाव आहे.

सर्वजित मोरे याचा भाऊ पोलीस खात्यात कार्यरत आहे. सर्वजित आधी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. नंतर त्याची नोकरी गेली आणि तो बेरोजगार झाला. सर्वजितने 17 ऑक्टोबर रोजी एका तरुणीशी प्रेम विवाह केला. दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध असताना त्यांनी लग्न केले आणि ताडदेव येथील पोलीस रहिवासी वसाहतीत राहू लागले.

लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये भांडणे झाली. काही महिन्यांनी मोरेची पत्नी त्याला सोडून आपल्या गावी कोकणात परतली आणि आपल्या काकासोबत राहू लागली. सर्वजितही तिच्या मागे गावी गेला आणि तिची समजूत काढून तिला परत आणले. त्यानंतरही दोघांमध्ये पुन्हा भांडणे झाली.

एक नोव्हेंबर रोजी सर्वजितची बायको घर सोडून निघून गेली. सर्वजित मोरेने आपल्या मित्रांकडे बायकोची चौकशी केली, परंतु तिचा ठावठिकाणा कळला नाही. अखेर सर्वजितने 11 नोव्हेंबर रोजी ताडदेव पोलीस स्थानकात बायको हरवल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सर्वजित मोरेच्या बायकोला शोधून काढले आणि तिला पोलीस स्थानकात बोलावून घेतले. त्यानुसार सर्वजित मोरेची बायको गुरूवारी सायंकाळी 8 वाजता पोलीस स्थानकात हजर झाली. पोलीस सर्वजित मोरेच्या बायकोची चौकशी करत होते, तेव्हा बाहेरून ओरडण्याचा आवाज आला.

सर्वजितने स्वतःला पेटवून घेतले होते. पोलिसांनी कशीबशी आग विझवली आणि त्याला जवळच्या नायर रुग्णालयात दाखल केले. सर्वजित 65 टक्के भाजला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सर्वजितने आधीच अंगावर पेट्रोल ओतले होते होते. त्याला पोलीस स्थानकात बोलावलेही नव्हते. आपली बायको पोलीस स्थानकात येणार असल्याची माहिती त्याला कुठूनतरी मिळाली होती. आणि आपल्या बायको समोरच त्याने स्वतःल पेटवून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *