पंतप्रधान नरेंद मोदी यांना एकच मागणी करतो, देशात समान नागरी कायदा आणा आणि देशातील लोक संख्या कमी करण्यासाठी कायदा आणा, अशी मागणीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. ‘आम्हाला तुमच्याकडे 5 जण आहे, त्यांचं काही वाटत नाही. पण या देशामध्ये काही गोष्टी होणे गरजेचं आहे. मला ज्या गोष्टींबद्दल विरोध करायचा होता, केला. उद्या […]
ताज्याघडामोडी
क्राईम मालिकेतून कल्पना घेऊन महिलेचा खून; कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजल्या
४२ वर्षीय महिलेला कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजून तिचा खून केल्याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या मौल्यवान वस्तू लुटणार्या आरोपीने गेल्या तीन महिन्यांत टीव्ही क्राईम मालिकेतून कल्पना घेतल्यानंतर खुनाची योजना आखली. रविवारी सकाळी घरकाम करणाऱ्या पीडितेचा मृतदेह हडपसर येथील वैदूवाडी परिसरात आढळून आला. तिच्याकडे दागिने, भ्रमणध्वनी आणि एटीएम कार्ड आढळून […]
मला सुसाईड नोट लिहिण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले
कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज एक गौप्यस्फोट केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला फुस लावल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद आहे. आता चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याचं […]
राज्यातील 4 बँकांना RBIचा दणका
आरबीआय च्या (RBI) नियमांचं पालन न केल्यानं चार सहकारी बॅंकांना दणका दिला आहे. सहकारी बँकांना नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळं तब्बल 4 लाखांचा दंड सुनावला आहे. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील तीन तर मध्यप्रदेशातील एका बँकेचा समावेश आहे. आरबीआयनं ज्या बँकांना दंड ठोठावला आहे त्यामध्ये नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, लातूरमधील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह […]
बारामतीच्या ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकास लाचखोरी प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी
महाराष्ट्र पोलीस दलाबाबत या राज्यातील जनता मोठा अभिमान बाळगताना दिसून येते.एकीकडे राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र पोलीस दलावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच सर्वसामान्य जनतेचा मात्र महाराष्ट्र पोलीस दलाबाबतचा अभिमान तुसभरही कमी झाला नाही असेच दिसून येते,आणि त्याला कारण आहे अजूनही या पोलीस दलात सर्वसामान्य जनतेला अतिशय आपुलकीची वागणूक देत त्यांच्यावरील अन्याय दूर करणारे कर्तव्यकठोर पोलीस […]
पंढरपुरात घडला खबळजनक प्रकार
पंढरपूर शहरात राहणारे एका कुटूंबातील पती पत्नीने आपली शारीरीक तंदुरुस्ती चांगली रहावी म्हणून पंढरपूर येथील एका नामांकित जीम मध्ये 18 जानेवारी 2022 रोजी पासून जाणे चालू केले होते.त्यांनी जीम मध्ये प्रवेश घेताना त्यांचे मोबाईल नंबर जीम मध्ये दिलेले होते सुरवातीस जीम मधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड रा. पंढरपूर याने डायटस घेण्याची माहिती देणेसाठी विवाहीत स्त्रीस […]
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला चार वर्षे घरात डांबले, पोलिसांच्या मदतीने झाली सुटका
बीड शहरातील एका महिलेस चारित्र्याच्या संशयावरून तिच्याच पतीने तब्बल चार वर्षांपासून घरात डांबून ठेवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी धाडसी पाऊल उचलल्यामुळे या महिलेची आज सुटका करण्यात आली. जालना रोडवरील रुपाली मनोज किन्हीकर यांचा वीस वर्षांपूर्वी श्रीमंत घरामध्ये विवाह झाला. सुखी आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून रुपाली यांनी संसाराला सुरुवात केली. सुरुवातीची दोन-तीन […]
राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता
वीज ही आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. वीजेशिवाय आपलं आयुष्य अशी कल्पना देखील करता येणार नाही. पण काही बातम्या इतक्या अनपेक्षित असतात की त्या मनाला धक्का देऊन जातात. अशीच काहीशी एक बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. […]
धावत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट; चालकाला आग लागल्याचे समजलंही नाही
परभणी शहरापासुन काही अंतरावर लातूरहून नागपुरकडे जाणाऱ्या धावत्या ट्रॅडल्सला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे . विशेष म्हणजे गाडीला आग लागल्याचे चालकाला समजलेच नाही. सुदैवाने ट्रॅव्हल्स मधील चाळीस प्रवाशी बालबाल बचावले आहेत . लातूरहून परभणी मार्गे नागपुरला जाणारी एम . एच . 40 वाय 9135 क्रमांकाची ट्रॅव्हल्स प्रवाशी घेऊन शनिवार 9 एप्रिल रोजी लातुरहुन […]
जुगारासाठी पोलीस जावयाकडून सासऱ्याची हत्या, घटनेने खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी, सासू आणि सासऱ्यावर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सूरज उगलमुगले असे हल्ला करणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जुगार आणि सट्टा खेळण्यासाठी वारंवार सासऱ्यांकडे पैशाची मागणी हा पोलीस कर्मचारी […]











