गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बारामतीच्या ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकास लाचखोरी प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्र पोलीस दलाबाबत या राज्यातील जनता मोठा अभिमान बाळगताना दिसून येते.एकीकडे राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र पोलीस दलावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच सर्वसामान्य जनतेचा मात्र महाराष्ट्र पोलीस दलाबाबतचा अभिमान तुसभरही कमी झाला नाही असेच दिसून येते,आणि त्याला कारण आहे अजूनही या पोलीस दलात सर्वसामान्य जनतेला अतिशय आपुलकीची वागणूक देत त्यांच्यावरील अन्याय दूर करणारे कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी व कर्मचारी होय. 

 मात्र असे असले तरी गेल्या वर्षभरापासून राज्यात लाचलुचपत विभागाकडून केलेल्या कारवाईत अगदी dysp दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांपासून ते सामान्य पोलीस कॉन्स्टेबल पर्यत शेकडो कर्मचारी यांच्यावर लाचखोरी प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात पहावयास मिळत आहे.मुंबईतील सौरभ त्रिपाठी नावाचा पोलीस उपायुक्त तर लाचखोरी प्रकरणी अजूनही फरार आहे.या साऱ्या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र पोलीस दलाबाबत अभिमान बाळगणारे पोलीस कर्मचारी आणी सामान्य जनता मात्र अस्वस्थ होत असल्याचे दिसून येते.   

काल दिनांक ११ एप्रिल रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे याने खाजगी इसमाच्या माध्यमातुन तक्रारदारास ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत  १५ हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या युनिटने रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी सदर पोलीस निरीक्षक व खाजगी इसम ऋषिकेश पतंगे या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *