पंढरपूर शहर व तालुक्यातील करुणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून येत असून आज 29 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 114 करूना बाधित यांची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर सतरा तर ग्रामीण भागात 97 बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार शहरातील तर ग्रामीण भागातील एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात […]
ताज्याघडामोडी
खळबळजनक! महिलेला एकाच दिवशी दोन डोस, 11 दिवसानंतर प्रकृतीबाबत चकीत करणारी माहिती
गोंदिया : कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. लसींचा तुटवडा असला, तरी उपलब्ध साठ्यातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सध्या 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण बंद आहे. मात्र त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोव्हिशील्ड लसीच्या एका डोसनंतर दुसरा डोस 6 ते 8 आठवड्याचं अंतर ठरवण्यात आलं आहे. मात्र […]
डॉक्टर दांम्पत्याचा दिवसाढवळ्या गोळ्याघालून खून, घटनेचा थरार सीसीटिव्हीत कैद
भरतपूर येथे दिवसाढवळ्या एका डॉक्टर दांम्पत्याचा गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार शहरातील हिरदास बस स्थानकाजवळी भर चौकात घडला असून दुचाकीवरुन दोघांनी येऊन डॉक्टर दांम्पत्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली व आरोपी फरार झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 4.45 वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा […]
दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलिसाला नेले फरपटत
पिंपरी चिंचवड परिसरात एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. संबंधित जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रे आणि लायसन्सची विचारणा केली असता. आरोपीने वाहतूक पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी […]
आदेशाची प्रत सोपवल्यानंतरच भीमा नगरचे १८ दिवसाचे धरणे आंदोलन मागे
भिमानगर येथे उजनी धरणाच्या गेटवरती गेल्या १८ दिवसापासून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले आंदोलन उजनी धरणाचे 5TMC पाणी बेकायदेशीररित्या शासनाने मंजूर केले होते ते रद्द केल्याचे लेखी आदेश शासनाने देऊन सुध्दा संबधित कार्यकारी अभियंता मोरे हे मला वरिष्ठ पातळीवरुन अजुन आदेश आले नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देत होते अखेर […]
मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली
मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात […]
तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून पत्नीचे आयुष्य संपवले
पुणे: पुण्यातील देहूगावात एका नवविवाहित जोडप्यात झालेल्या भांडणातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. अगदी किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने आपल्या पत्नीचा खून केला. पूजा वैभव लाकमाने असे मयत तरुणीचे नाव आहे. पूजा आणि वैभव यांनी तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. त्यानंतर हे दोघे देहूगावामधील साई नगरी, वडाचा मळा याठिकाणी ते राहत होते. मात्र, अवघ्या काही […]
सासरच्या दारातच केला लेकीचा अंत्यसंस्कार, छळ करून विष पाजून मारल्याचा संशय
लेकीचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या दारामध्येच तिच्या पार्थिवावर माहेरच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. बारामती तालुक्याच्या सांगवी या गावात हा प्रकार घडला. सासरच्या मंडळीनं मुलीचा छळ करून तिला विष पाजून मारल्याचा माहेरच्या मंडळींचा संशय आहे. त्यामुळं रागाच्या भरात माहेरच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे सासरच्या दारातच मुलीचा अंत्यसंस्कार केला. सांगवी येथील गीतांजली नावाच्या विवाहितेच्या पोटात विषारी औषध गेल्याची घटना घडली […]
लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवणार, 1 जूनला नवी नियमावली
पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात कोरोनाचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केलीय. राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल. तर शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. […]
तरुणास बेदम मारहाण करणाऱ्या लाचखोरी प्रकरणातील ‘त्या’डीवायएसपीची चौकशी करण्याचे आदेश
हॉस्पिटलमधील वादावादीवेळी संपूर्ण गवळी समाजाची आईबहीण काढणारा जालन्याचा डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश औरंगाबाद रेंजचे आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिले आहेत. 9 एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातील दीपक रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात […]