ताज्याघडामोडी

प्रेमाचे गोड गोड मेसेज पाठवून ही तरुणी कमावते लाखो रुपये!

एखाद्या कामाचा भरपूर मोबदला हवा असेल तर त्यासाठी पुष्कळ मेहनत करावी लागते. पण, जर कुणाला फक्त प्रेमाचे मेसेज पाठवून महिन्याला दीड लाख रुपये मिळत असतील तर? हे काम करणारी एक तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने एक व्हिडीओ प्रसारित करत आपल्या या अनोख्या कमाईच्या साधनाचा उल्लेख केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार गेली तीन वर्षं […]

ताज्याघडामोडी

अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या सातत्याने झालेल्या आंदोलनास मोठे यश

पंढरपूर नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी यांच्या वारसांना लाड / पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरी मिळण्याकरिता सन 2001 पासून कामगार नेते सुधीर जानजोत नगरसेवक पुणे महानगरपालिका अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेने वरिष्ठ नेते राजनदादा चिंडालिया, सायमन गट्टू, जिल्हाध्यक्ष गदवालकर, बाली मण्डेपू यांच्या माध्यमातून लढा उभा केला होता. त्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. दि.20/01/2022 रोजी राज्यातील […]

ताज्याघडामोडी

दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केले आहे. माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२२ पासून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होतील आणि १४ मार्चपर्यंत चालतील. तर, १४ फेब्रुवारी ते ३ मार्चच्या दरम्यान बारावीच्या परीक्षा होतील. तथापि, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अपडेट्ससाठी, तुम्ही एमएसबीएसएचएसईच्या […]

ताज्याघडामोडी

नथुरामाच्या भूमिकेच्या वादावर शरद पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेता अमोल कोल्हे ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या माध्यमातून नथुराम गोडसेंच्या भूमिकेत झळकणार आहेत. मात्र, या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेंची साकारलेल्या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे मंत्री आपापसात भिडले. त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पैशांसाठी खासगी सावकाराने दिड महिन्याच्या बाळालाच पळवले

कोरोनामुळे कितीतरी सामाजिक स्थित्यंतरे घडत असताना सातार्‍यात देखील धक्कादायक प्रकार कधी कधी समोर येत आहेत. असाच धक्कादायक व वेदनादायी प्रकार एका कुटुंबाबाबत घडला असून खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून टाकीन, जीवे मारीन अशी धमकी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

RTO मध्ये आलेल्या वाहनचालकाकडे लाच मागितली, ACB ने एजंटसह अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या

बीडमध्ये आरटीओ कार्यालयात आलेल्या वाहनचालकाकडे त्याचं काम पूर्ण करण्यासाठी लाच मागणं एका खासगी एजंट आणि अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी प्रतिवाहन पाचशेप्रमाणे चार वाहनांसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या वाहन निरीक्षकासह एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान एसीबीच्या कारवाईने एआरटीओतील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. रविकिरण नागनाथ भड असे […]

ताज्याघडामोडी

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; 23 आणि 24 जानेवारीला कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग घोंगावत आहेत. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 23 आणि 24 जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदललं आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

स्टाफरुममध्ये बोलावून शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा लैंगिक छळ

अल्पवयीन विद्यार्थीनीला स्टाफरूममध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील एका माध्यमिक शाळा शिक्षकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या शिक्षकाला अटक करून न्यायायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. श्रीकांत बीरा मासाळ असे या शिक्षकाचे नाव असून तो मूळचा मंगळवेढा इथला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमीयुगुलाने एकाच साडीने घेतला गळफास, महिला बचावली

बीड जिल्ह्यात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या दोघांनी एकाच साडीला गळफास घेतला होता. मात्र, महिलेच्या भागाकडील साडीची गाठ सुटल्याने ती यातून बचावली आहे. मात्र, तरुणाचा मृत्यू झाला आहे. या युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत. महिलेने याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. बीडमधील जयपाल व्हावल (24) आणि ठाण्यातील एका […]

ताज्याघडामोडी

लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसी लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण तशा प्रकारची शिफारस डीसीजीआयच्या समितीने केली आहे. औषध महानियंत्रकांच्या परवानगीनंतर या दोन लसी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणजेच लसींची खुलेआम विक्री करता येणार नाही. तर कोविन पोर्टलवर नोंदणीकृत असलेली रुग्णालये आणि […]