ताज्याघडामोडी

नथुरामाच्या भूमिकेच्या वादावर शरद पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेता अमोल कोल्हे ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या माध्यमातून नथुराम गोडसेंच्या भूमिकेत झळकणार आहेत. मात्र, या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेंची साकारलेल्या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे मंत्री आपापसात भिडले. त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ‘अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून भूमिका साकारली आहे. त्यामुळे नथुरामाच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पहायला हवे’, असे शरद पवार म्हणाले.

ते म्हणाले, ‘कलावंत म्हणून मी सर्वच कलाकारांचा सन्मान करतो. याआधी महात्मा गांधी यांच्यावर जो सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्या सिनेमात कोणीतरी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका करणारा नथुराम गोडसे नव्हता, तर कालाकार होता. त्यामुळे एखादी भूमिका साकारताना त्याच्याकडे कलाकार म्हणून पाहयला हवे’, अस ते म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी एक कलावंत म्हणून नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे, असे म्हणत त्यांनी पवार यांच्याकडून अमोल कोल्हे यांची पाठराखण करण्यात आली. ते म्हणाले, ‘२०१७मध्ये अमोल कोल्हे यांनी भूमिका केली, त्यावेळी ते राष्ट्रवादीत नव्हते. कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल याचा अर्थ त्यांनी गांधीविरोधात भूमिका केली असे होत नाही’, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *