ताज्याघडामोडी

लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसी लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण तशा प्रकारची शिफारस डीसीजीआयच्या समितीने केली आहे.

औषध महानियंत्रकांच्या परवानगीनंतर या दोन लसी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणजेच लसींची खुलेआम विक्री करता येणार नाही. तर कोविन पोर्टलवर नोंदणीकृत असलेली रुग्णालये आणि क्लिनिकशी संबंधित मेडिकल स्टोअर्समध्येच या लसी उपलब्ध केल्या जातील.

याशिवाय केवळ पात्र नागरिकच ही लस विकत घेऊ शकणार आहेत. कोव्हिशिल्ड या लसीची निर्मिती पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने तर हैदराबादच्या भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *