जागेचा उतारा देण्यासाठी आणि सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वेल्हा तालुक्यातील कोदवडी गावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मुकुंद त्रिंबकराव चिरटे (वय 34. रा. नसरापूर ता. भोर, तलाठी कोदवडी वेल्हा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या संस्थेनी 20 गुंठे जागा […]
ताज्याघडामोडी
राम मंदिरावरील टीकेवरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून राम मंदिरावरुन करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परिसरातील वाहतूक हाणामारीमुळे विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी केलेल्या […]
मागण्या मान्य करण्याची सरकारची तयारी; उद्या वर्षावर होणार महत्त्वपूर्ण बैठक
पुणे, 16 जून: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येते संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक होणार […]
केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं. त्याला दोन्ही सरकारे दोषी आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा पार पडला. प्रकाश आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. […]
मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये चिमुकल्याचा तर सासवडमध्ये आईचा आढळला मृतदेह
पुणे, 16 जून: पुण्यात मायलेकराची हत्या करून त्यांचा मृत दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी मायलेकराचा खून झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून महिलेच्या पतीचा शोध घेतला जात आहे. हत्या झालेल्या दिवसापासून मृत महिलेचा पती गायब आहे. संबंधित मायलेकराची हत्या नेमकी कोणी केली अद्याप स्पष्ट […]
सर्व खासगी क्लासेस 21 जूनपासून सुरू होणार?
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्हिटी दराचे निकष लक्षात घेता राज्य सरकारने पुण्यासह काही जिल्ह्यांत 50 टक्के उपस्थितीसह सर्व खासगी क्लासेस सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र, सरसकट राज्यभरात खासगी क्लासेस सुरू न झाल्याने त्यांची आर्थिक परवड होत आहे. त्यामुळे आरोग्याचे सर्व नियम पाळून 21 जूनपासून महाराष्ट्रातील सर्व खासगी क्लासेस सुरू करण्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य खासगी […]
सरपंचाला 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती […]
शूटिंग काढा’ म्हणत तरुणाने मारली पुलावरून उडी
मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा’ असे सांगत एका तरुणाने दारणा नदीच्या पुलावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात येऊन वाचवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवार (दि. १४) दुपारी तीनच्या सुमारास विकास विनायक लाखे (१९) रा. भोर मळा, सिन्नरफाटा नाशिकरोड याने चेहेडी येथील दारणा […]
शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाल्या….
मुंबई | मागील वर्षभरापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती खूपच गंभीर होती. परंतू, आता कोरोनाची परिस्थिती हळू-हळू सुधारत आहे. रूग्णांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा गोष्टी पुर्ववत सुरू करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा शाळा कधी सुरू होणार? याबाबत सवाल केला जात होता. काही दिवसांपूर्वी राज्य […]
तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आयुक्तांचा दणका, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सुनावली शिक्षा
वानवडी परिसरात डिसेंबर 2020 मध्ये बेटींगप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. त्यानुसार पाच जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यातील आरोपी मनीष अजवानी याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढला असता, वानवडीचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे छापा टाकण्यापूर्वी आरोपीसोबत बोललेल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे 13 वेळा फोनवर बोलणे झाल्याचे सीआडीआरमध्ये दिसून आले. […]











